तरुणाईचे वणवे

समाजकारण आणि राजकारण यांतील विद्यार्थ्यांचा वाढता सहभाग हे लोकशाहीच्या दृष्टीने आशादायक चित्र आहे. आपली बरी – वाईट मते व्यक्त करण्याची मुभा आजच्या समाजव्यवस्थेत तरुणांना मिळाली आहेत. ही पिढी सजग आहे. त्यांना समस्येचे भान आहे आणि त्यांच्या परिणामांचे गांभीर्य ओळखण्याइतकी सक्षमता त्यांच्यात
आली आहे. समाजात जे-जे काही घडत असते त्यावर विचार करून व्यक्त होण्याचा आणि प्रसंगी कृ ती करण्याचा आत्मविश्वास त्यांना प्राप्त झाला आहे. याचं श्रेय आपल्या शिक्षण व्यवस्थेला द्यावे लागेल. परंतु अनेकदा याच शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राजकीय वाद झडतात आणि त्याचे रूपांतर संघर्षात होते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयु) हे अशा संघर्षांचे आगार. तिथे विद्यार्थ्यांच्या दोन गटांत हाणामारी झाली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना वसतिगृहात मांसाहार करण्यापासून रोखले आणि हिंसेचे वातावरण तयार झाले. या आरोपाचे खंडण करण्यात आले असून अभाविपने रामनवमीनिमित्त आयोजित पूजा कार्यक्रमात डाव्यांनी अडथळा निर्माण के ला असा प्रत्यारोप के ला. जेएनयु म्हणजे डावी विचारसरणी असे समीकरण गेल्या काही वर्षांपासून रुळू लागले आहे. तेथील काही आंदोलने इतकी भडक होती की विद्यार्थी – नेत्यांवर देशद्रोहाचे आरोप झाले. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि लोकशाही मूल्यांना थेट आव्हान देणारी वक्तव्ये विद्यार्थी करू लागले. यामुळे वातावरण तापण्यात क्षणाचाही विलंब लागत नसे. मुळात शिक्षण संस्थांमध्ये कोणतीही आक्षेपार्ह कृ ती निंदनीयच आहे. आपण विद्यापीठात अध्ययन करायला जातो की भविष्यात करावयाच्या राजकारण्याचे धडे गिरवायला? राजकीय साक्षरतेबरोबर परिपक्वता येणे तितके च महत्वाचे असते. ती नसेल तर विद्यार्थी आपणहून राजकीय पक्षांना स्वतःला टपाले करतील आणि तसे होणे देशासाठी घातक आहे. ज्यांच्याकडे उद्याचे जबाबदार नागरिक म्हणून आपण पाहत असतो ते अशा वादांमध्ये आणि हिंसाचारात अडकू लागले तर विद्यापीठ भावी पुढाऱ्यांचे कारखानेच बनतील. मतपेढीच्या राजकारणात विद्यार्थ्यांच्या मतांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांनी आपला ‘वापर’ होणार नाही याची खबरदारी घ्यायला हवी. शाळा – महाविद्यालयांतील तंटे अनेकदा रौद्र रूप धारण करतात आणि या विस्तवावर नेतेमंडळी त्यांच्या त्यांच्या राजकीय पोळ्या भाजत घेत राहतात. संपूर्ण जगात सध्या तरुणांचा एकच कल्लोळ सुरू आहे. प्रत्येकाला बोलण्याची घाई झाली आहे. अपरिपक्व मते तयार के ली जात आहेत. त्याला खतपाणी घालत आहे आपलीच सदोष शिक्षण – व्यवस्था आणि अनैतिकतेला स्वीकारणारे नेते. विद्यार्थीवर्गानेव्यक्त होताना पूर्वग्रहदषिू त दृष्टिकोन वा एखाद्या राजकीय विचारसरणीचा प्रभाव बाजूला ठे वायला पाहिजे. तसेझाले नाही तर तरुणाईचे वणवे पेटत राहतील आणि लोकशाहीच्या मूळ गाभ्यालाच त्याची झळ बसेल.