धनुष्यबाणाऐवजी कमळच का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजपा एकत्र येणार हे सर्वसाधारणपणे ज्याला राजकारणाची जुजबी माहिती आहे अशा मंडळींना ठाऊक होते आणि आपले भाकित खरे ठरले याचा आनंद ते सध्या घेत असतील. अनिश्चितता ही सध्याच्या राजकारणाची आणि उथळपणा ही बहुतांश नेत्यांची ओळख बनत चालली असताना मनसेने भाजपाला बिनशर्त पाठिं बा द्यावा ही बातमी आश्चर्याचा धक्का वगैरे देणारी नक्कीच ठरलेली नाही. राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील घराच्या गॅलरीत ज्या दिवशी देवेंद्र फडणविस दिसले तेव्हाच खरे तर दोस्तीचे पर्व सुरु होणार हे अनेकांनी ताडले होते. राज ठाकरे यांच्या मनसेचे सध्याचे राजकीय यश एका आमदारापुरते सीमीत असले तरी आगामी काळात भाजपाशी जमवून घेतले तर हे यश विधानसभेत आणि महापालिके त अनेक पटीने वाढले तर नवल नाही. तुर्तास लोकसभा निवडणुकीत या मैत्रीचा
आविष्कार उमेदवारीच्या आघाडीवर दिसणार नाही. परंतु शिवसेनेला (उद्धव ठाकरे गट) तोडीस तोड उत्तर देणारी तोफ राज यांच्या रुपाने धडधडू लागेल. तेव्हा एक ठाकरे दसऱ्ु या ठाकरेंवर हल्ला करतो, असे चित्र उभे राहिल. भाजपाला उद्धव ठाकरे यांची राजकीय करकीर्द संपवण्यासाठी ही चाल उपयोगी ठरेल, असे बोलले जात आहे. ते बरोबर आहे. बेरजेच्या राजकारणाचे दिवस आहेत. परंतु कडवे विरोधक गळ्यात गळे घालतात तेव्हा खरोखरीच बेरीज होते काय हा प्रश्न आहे. मागच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भाजपावर सडकू न टीका के ली होती, हे जनता विसरलेली नाही. जनतेची स्मरणशक्ती नेहमीच दबळी असते असे मानता येणार नाही. खास करुन राज ु ठाकरे यांच्यासारख्या फर्ड्या वक्त्याची भाषणे दीर्घकाळ लक्षात रहात असतात. त्यामुळे त्यांचा ‘स्टाट-प्रचारक’ म्हणून किती वापर होईल हे सांगता येणार नाही. मात्र मनसेचा उपयोग कसा होणार हे पहावे लागेल. उद्धव यांना ठाकरे आडनावामुळे मिळणारी सहानुभूती करण्याचा हेतू ‘इंजिन’ आपल्याकडे आणण्यामागे असू शकतो. शिवसेनेची मराठी मतांवरील पकड ढिली करुन या मतपेढीतला काही भाग मिळवणे हा दसरा हेतू असू शके ल. मराठी मनात संभ्रम करणे ु
आणि हिन्त्दु वाच्या मुद्याकडे अशा अनिर्णायक मतांना वळवणे हा या व्युहरचनेचा भाग असू शकतो. कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेला ‘डॅमेज’ करणे हा अंतिम हेतू सफल करण्यासाठी भाजपाने राज ठाकरे यांचा पाठिं बा मिळवलेला दिसतो. तसे पाहिले गेले तर मनसेला लोकसभेत खासदार पाठवण्यात फार स्वारस्य नसणे हे भाजपाच्या पथ्यावर पडणारे आहे. त्यासमोर आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्त लोकप्रतिनिधी महायुतीच्या मदतीने पाठवणे फलदायी ठरेल हा दरगामी ू विचार राज ठाकरे यांनी के लेला दिसतो. राज ठाकरे यांच्या ताज्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असताना, एक टोकदार प्रश्न जनतेच्या मनात घोळू लागला आहे आणि तो असा की राज ठाकरे यांनी भाजपाला पाठिं बा देण्याऐवजी शिंदे यांच्या शिवसेनेला टाळीसाठी हात का दिला नाही? काही झाले तरी ती निदान शिवसेना तर होती? आता यात भाजपाने बाजी मारली की राज आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर फार विकल्पच राहिलेले नाहीत?