‘श्रीरंग’ला नाही कोणी वाली !

ठाणे महापालिके च्या रस्ता रुं दीकरणाचे सर्वसामान्यतः स्वागतच करण्यात आले आहे. अगदी मधुकर चौबे, टी.चंद्रशेखर आणि पुढे संजीव जयस्वाल यांनी प्रामुख्याने या आघाडीवर उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्याबद्दल ठाणेकर आजही त्यांचे नाव काढत असतात. विद्यमान आयुक्त अभिजीत बांगर यांनीही रुं दीकरणास प्राधान्य दिल्याचे दिसते. आम जनता दररोजच्या वाहतूक कोंडीतून कोणीतरी आपली सुटका करील या आशेवर असते. त्यामुळे श्री. बांगर यांच्या रुं दीकरण मोहिमेचे स्वागतच होईल. तसेअसले तरी किती प्रसंगी रुं दीकरणानेमूळ हेतू साध्य केला याचाही आढावा घ्यावा लागेल. सध्या श्रीरंग सहनिवासातील मुख्य रस्त्याच्या रुं दीकरणाचा विषय
ऐरणीवर आला असून त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत असून श्री. बांगर त्याची योग्य दखल घेतील ही अपेक्षा आहे. शहरातील एक मोठी आणि जवळजवळ अर्ध्या
शतकांपूर्वी स्थापन झालेली श्रीरंग गृहनिर्माण संस्था ही राज्यातील एक जुनी आणि सर्वदर पर ू िचित अशी वसाहत मानली जाते. अनेक नामवंत मंडळींप्रमाणे वरिष्ठ
सरकारी अधिकारी यांची निवासस्थाने याच सोसायटीत आजही आहेत. दरवर्षी पुराचा तडाखा बसून पावसाळ्यात बोटींनी कु टुबा ं ंना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची छायाचित्रे आजही या सोसायटीची ओळख म्हणून स्मृतीपटलावर कोरली गेली आहेत. यथावकाश जवळून जाणाऱ्या नाल्याचेरुं दीकरण आणि खोली वाढवणे ही उपाययोजना महापालिके ने केली आणि श्रीरंगवरील पुरग्रस्ताचा शिक्का जवळजवळ पुसला गेला. एकीकडे हे सुखद परिवर्तन होत असताना येथील रहिवाशांच्या मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकासाचा प्रस्ताव पुढे आला. १९६८- ६९ मध्येनिर्माण झालेल्या वसाहतीच्या इमारती जीर्ण आणि राहण्यालायक राहिल्या नव्हत्या.
२०१४ मध्ये या धोकादायक म्हणून जाहीर झालेल्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या. आज आठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असून विकासक, मूळ रहिवासी आणि रहिवाशांच्या घटक संस्था यांच्यात एकमत होत नसल्याने पुनर्विकास बारगळला आहे. त्याबाबत कोणीच निश्चिती देत नाही. विविध न्यायालयांत परस्परविरोधी दावे प्रलंबित असून गुंता प्रचंड वाढला आहे. पुनर्विकासाच्या या सावळ्या गोंधळात महापालिके चा रुं दीकरणाचा प्रस्ताव आला आहे. त्यामुळे अनेकांच्या घराला खेटूनच हम रस्ता जाणार आहे. या रस्त्याच्या रुं दीकरणाची गरज होती काय असा सवालही उपस्थित केला जात आहे कारण रस्त्याच्या दतरु ्फा बेकायदा पार्किं गमुळेजेवढे प्रस्तावित रुं दीकरण आहे तेवढी जागा ही वाहने व्यापून आहेत. त्यांचा बंदोबस्त केला तर रुं दीकरणाचा खर्चवाचू शकतो तो वेगळाच अशी भूमिका काही रहिवासी मांडत आहेत. त्यात तार्किकदृष्ट्या तथ्य आहे. घर असूनही आठ वर्षांपासून बेघर झालेल्या श्रीरंगच्या रहिवाशांना नियोजित रुं दीकरणामुळे आपल्या घराचे स्वप्न अर्धवट तर राहणार नाही, अशी भीती वाटूलागली आहे. क्लस्टर विकास आणि वाढीव चटईक्षेत्राच्या बातम्या वाचून आशा पल्लवित झालेली जनता रुं दीकरणाच्या या प्रस्तावामुळे भयभीत झाली आहे. विशेष म्हणजे ‘श्रीरंग’चा हा गुंता सोडवण्याऐवजी स्थानिक नेतृत्व ‘स्मार्ट-सिटी’ प्रकल्पात रंगून गेले आहे. ‘श्रीरंग’ रहिवासी या चक्रव्यूहातून सोडवणारा कोणीतरी माईचा लाल पुढे येईल म्हणून मोठ्या आशेने वाट पाहत आहेत.