बोरिस यांचे अनुकरण करा

नैतिकतेची चाड कशाशी खातात हे ठाऊक नसलेल्या आपल्या देशातील राजकारण्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी दिलेल्या राजीनाम्याचे प्रकरण नीट लक्षात घेऊन असे आरोप आपल्यावर झाले तर खुर्ची सोडण्याची हिंमत दाखवावी. जॉन्सन यांनी राजीनामा दिला ती कारणे पाहता त्यांची भला मण करता येणार नाही. परंतु जनाची नाही तरी मनाची लाज बाळगून त्यांनी ही उक्ती आचरणात आणली. राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस खालावत जात असताना अशी कृती करणे, हेही नसे थोडके !

मूळ पत्रकार असलेल्या जॉन्सन यांनी राजकारणात प्रवेश के ला. लंडनचे महापौरपद, खासदार, परराष्ट्र सचिव अशा जबाबदाऱ्या सांभाळत ते पंतप्रधान पदापर्तयं पोहोचले. पत्रकारिता करताना अपुऱ्या माहिती आधारे वृत्तांकन के ले म्हणून ‘द टाइम्स’ने त्यांना काढून टाकले होते. ही फु टपट्टी भारतीय माध्यम वीरांसाठी लावली तर अर्ध्याहून अधिक पत्रकारांना घरीच बसावे लागेल! असा विषय पत्रकारितेचा नसून ब्रिटनमध्ये सार्वजनिक जीवनाशी निगडित काम करणाऱ्या जॉन्सन यांच्यासारख्या
सर्वांनाच एक आचारसंहितेला अधीन राहून काम करावे लागते आणि त्यात नैतिकतेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होते. आपल्याकडे त्याबाबतीत आनंद आहे. विनयभंग ते बलात्कार करणारे राजकारणी मंत्रीपदी बिनधोक राहू शकतात. भ्रष्टाचार के ला नाही तर उलटपक्षी पक्षश्ष्रे ठीच त्यांची उचलबांगडी करतात. शब्द पाळणे आणि उत्तरदायित्वाला जागे राहणे हा परदेशात सामाजिक संस्काराचा भाग असतो आणि या मूल्यांशी तडजोड खपवून घेतली जात नाही. त्यामुळे जॉन्सन यांची वादग्रस्त प्रकरणे उघडकीस आल्यावर त्यांनी खुर्ची सोडावी याकरिता जनतेला आं दोलन करावे लागले नाही. जनतेच्या भावना आपल्याविरुद्ध आहेत हे लक्षात घेऊन त्यांनीच राजीनामा दिला.

जॉन्सन यांना पंतप्रधानपद सोडण्यास त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे राजीनामा सत्र हेही कारणीभूत होते. काळाची पावले ओळखून जॉन्सन यांनी काढता पाय घेतला. आपल्या देशात अशा बिकट प्रसंगात नेते अडकले तरी सत्तेचा मोह त्यांना सोडवत नाही. त्या दृष्टिकोनातून आपल्या पुढाऱ्यांनी विचार करायला हवा. सत्ता आणि अधिकार यांचा उपयोग मर्दित या रूपातच करायचा असतो. त्याचा अतिरेक झाला की अधोगती सुरूच झाली समजा, सत्तेवर असल्यामुळे कारवाई होणार नाही हा फाजिल आत्मविश्वास नेत्यांमध्ये आला कारण सार्वजनिक जीवनात जबाबदारीने वागले नाही तर जनता खपवून घेते हा ठाम समज त्यास कारणीभूत आहे. जनतेचा अंत पाहणारे भारतातले नेते आणि आपला अंत जनरेट्यामुळे झाला असे न वाटणे यातील फरक जॉन्सन यांच्या पदत्यागाने अधोरेखित झाला. निदान याबाबतीत तरी त्यांना आदर्श मानायला हरकत नाही !