दंड थोपटले !

सत्तांतर नाट्यानंतर प्रथमच मुंबईत आलेले कें द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपा नेत्यांच्या बैठकीत के लेले भाषण अपेक्षेप्रमाणे आक्रमक होते. शिवसेनेबद्दल असलेल्या नाराजीची जाहीर वाच्यता करताना त्यांना जवळजवळ संपवण्याची भाषा मात्र आगामी काळात राज्याचे राजकारण भलतेच तापणार याचे सुतोवाच करणारे
आहे. मुंबई महापालिके त भाजपाने सत्ता काबिज करण्याचा संकल्प सोडला आहे आणि त्यास शिवसेना कसे उत्तर देते हे दसरा मेळाव्यात समजेल. परंतु एक खरे की शिवसेनेला भाजपाच्या या नव्या अवताराला सामोरे जाताना पक्षाच्या आतापर्यंतच्या ध्ये धोरणांचा फे रविचार करावा लागेल. भाजपाच्या या आक्रमकपणामागे के वळ सूडाची भावना आहे काय? या प्रश्नांचे उत्तर होकारार्थी आहे. याचे कारण पक्षाचा वाढलेला आत्मविश्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वलयाचे गारुड बहुभाषिक होत चाललेल्या मुंबईकरांवर आहे. मराठी अस्मितेचे शस्त्र शमीच्या झाडावरुन काढून दसरा मेळाव्यात परजावे लागेल. परंतु तेवढ्याने ईप्सित साध्य होईल काय? अस्मितेचे
कार्डहिन्त्व स् दु वीकारले त्या दिवसापासून शिवसेनेवर ‘ऑप्शन’ला टाकावे लागले होते. मराठी माणसाचे हीत हा मूळ पाया गेल्या काही वर्षात कमकु वत होत गेला. आता त्याला आलिंगन देताना अमराठी माणूस दरुावणार नाही याचीही काळजी घ्यावी लागणार. ही खरी तारेवरची कसरत आहे. उमेदवार देण्यापासून ते नव्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीपर्यंत अमराठी माणसाला सहभागी करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न शिवसेनेला करावा लागेल. मराठी माणसावर या नवीन व्यवस्थेत अन्याय
होणार नाही याची काळजी श्री. उद्धव ठाकरे यांना घ्यावी लागणार. भाजपामधील मराठी नेते आणि भाजपाचे मराठी मतदार यांना शिवसेना या दोन्ही आघाड्यांवर काय
भूमिका घेते हे पहावे लागणार आहे. मराठी माणसाची सहानुभूती नेहमीच शिवसेनेला मिळत आली आहे. शिवसेनेला अलिकडच्या काळात पडलेले खिंडार आणि
त्यामुळे पसरलेली अस्वस्थता यांचा दहेरी पर ु िणाम होऊ शकतो. कट्टर शिवसैनिक भाजपाला ‘खलनायक’ म्हणूनही पाहू लागतील तर भाजपा आपणच खऱ्या मराठी अस्मितेचे कै वारी असल्याचा दावा शिंदे गटाचे मनोबल वाढवत करीत राहणार. आपण नेमके कोणत्या पक्षात जायचे, अशा संभ्रमात मतदार असणार. ही द्विधा अवस्था दर करण्यास ू ाठी शिवसेनेला आक्रमकपणाबरोबर फे रबांधणीचा मार्ग स्वीकारावा लागेल. ही नवीन सेना सर्वसमावेशक करावी लागेल. महापालिका निवडणुकीत
हिन्त्व वगैरे व्यापक मु दु द्दे विकले जात नसतात. जनतेच्या दैनंदिन समस्या, राहणीमानातील वृद्धी आणि विकासाला (सामाजिक- सांस्कृतिक) पोषक वातावरण निर्माण करावे लागेल. भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षाला असा ‘मायक्रो’ विचार करताना मर्यादा पडतात. त्याचा फायदा शिवसेना कशी उठवते हे पहावे लागेल. श्री. शाह यांनी शिवसेनेसमोर आव्हान फे कले आहे. परंतु ते राष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीकोनातून शिवसेनेला तोडीस तोड उत्तर देण्यापेक्षा नवीन व्यूहरचना आखण्यात वेळ द्यावा. त्यांच्यासाठी हा कसोटीचा क्षण आहे. भाजपा आपल्या जुन्या मित्राची परीक्षा घेत आहे. आता या मित्राला जुन्या-नव्याची घुसळण करुन उत्तरपत्रिका लिहावी लागेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर ही शेवटची संधी समजून निवडणुका लढवा असे म्हटले आहे. फडणवीस यांचा होरा चुकीचा ठरवण्यासाठी सेनेला प्रयत्न करावा लागेल.