भारताची तंत्रज्ञान क्षेत्रात घोडदौड सुरु असून महासत्ता होण्याच्या वाटेवरील या प्रवासाची गती सुखावणारी आहे. भारतात जन्माला आलेले तंत्रज्ञ असोत की डॉक्टर, व्यावसायिक असोत की शेतकीतज्ज्ञ, हे जागतिक पातळीवरील मानाच्या अशा संस्थांमध्ये आपला ठसा उमटवत आहेत. असे असूनही देशात संशोधकांची संख्या तुटपुंजी आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये अशी परिस्थिती आहे. ग्लोबल नॉलेज इंडेक्सच्या क्रमवारीत 138 देशांच्या यादीत भारताचा क्रमांक 75 वर आहे. तुलनेने दक्षिण कोरियामध्ये संशोधकांची संख्या 7498 तर इंग्लंडमध्ये 43४1 तर जपानमध्ये 5304 अशी आहे. तसेच प्रत्येक देशाचा ‘जीके आय स्कोअर’ काढला जात असतो, आणि त्याची जागतिक सरासरी 46.7 टक्के असताना भारताची 44.4 टक्के इतकी आहे. हीच गत स्टार्टअप्सच्या बाबतीत आढळते. आपल्या देशात 77 हजार स्टार्टअप
असून जगात आपला तिसरा क्रमांक लागतो. मूलभूत संशोधनाच्या तुलनेत अन्य दोन आघाड्यांवर आपली कामगिरी आशादायी आहे असे म्हणायला वाव रहातो. हजारो वर्षांपूर्वी वेद-उपनिषदाच्या माध्यमातून अत्यंत परिपक्व आणि काळाच्या पुढचे तत्वज्ञान आणि धर्मकारण सांगणाऱ्या या देशाकडे अवघे जग कु तुहलाने आणि कौतुकाने पहात असे. खगोलशास्त्र असो की वैद्यक शास्त्र, वास्तूशिल्प शास्त्र असो की स्थापत्य अभियांत्रिकी याचे थक्क करणारे प्रयोग आपल्या पूर्वजांनी के ले. शेतीचे प्रयोग, जलसंवर्धन, गड, किल्ले आणि भव्य तसेच देखण्या देवळांची निर्मिती याच देशातील तज्ज्ञांनी आणि पुरेशी समज असणाऱ्या कारागिरांनी बजावली होती. अचंबित
करणाऱ्या या प्रवासास खिळ कधी पडली असेल? सातत्याने परकीयांची आक्रमणे, मग ते मुघल असोत वा इंग्रज, पोर्तुगीज वा डच. त्यांनी आपल्यातील अभिजात आणि उपजत कलेला, ज्ञानाला वाव दिला नाही. संशोधक कमी असल्याचे समर्थन होणार नाही, परंतु परिस्थितीमुळे आपली पिछेहाट झाली हे तरी मान्य करावेच लागेल. जी संशोधने जागतिक पातळीवर सुरु आहेत, त्यात भारतीय प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे सामील आहेत. मुक्त अर्थव्यवस्थेचे नव्वदीचे दशक शिक्षण क्षेत्रातही परिवर्तनाचे वारे घेऊन आले. या काळात अभियांत्रिकी महाविद्यालयांचे पेव फु टणे हे त्याचे द्योतक. देश घडवायचा तर पायाभूत सुविधा हव्यात आणि त्या साकार करण्यासाठी हात. आपल्या शिक्षण संस्थांनी ही कामगिरी चोख बजावली. परंतु नवनवीन संशोधनाला अनुकू ल वातावरण निर्माण करण्यात त्या कमी पडल्या. टाटा मूलभूत संशोधन संस्था असेल वा आयआयटी सारख्या याच कामासाठी वाहिलेल्या संस्था असोत येथे अध्यापन करणारे विद्यार्थी संशोधनकार्यात गुंतले आहेत. सरकारने ही प्रज्ञावंत मंडळी देश सोडून जाणार नाही याची काळजी घ्यायला हवी तसेच संशोधनासाठी लागणारी तरतूद वाढवायला हवी. हा पुरोगामी दृष्टीकोन सरकार ठे वू पहात आहे, ही आनंदाची बाब आहे. हुशारी आहे तिचे चिज करणारे पर्यावरण तयार करण्याची गरज आहे.