अल्पजीवी आदर्शवाद !

राजकारणाबद्दल फार प्रेम वा आदर बाळगावे अशी स्थिती नाही. सारेच एका माळेचे मणी अशी गत. झेंडा कोणताही असो बहुसंख्य नेतेमंडळी एकच रंग उधळत आले आणि तो म्हणजे सवंगपणाचा. नाही म्हणायला या सर्वसामान्य समजुतीस बगल देणारे सन्माननीय अपवाद अधूनमधून अंधारलेल्या राजकीय नभांगणात चमकताना दिसतात. त्यापैकी एक कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ मतदार संघाचे माजी खासदार राजू शेट्टी. शेतकरी संघटनेचे लढवय्ये आणि अभ्यासू नेते अशी ख्याती असलेल्या शेट्टींनी राजकारण्यांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला खरा, परंतु दोनदा लोकसभेत निवडून गेलेल्या या नेत्याचापुनश्च उलटा प्रवास सुरू झाला आहे. जनतेचा आशावाद मात्र अल्पजीवी ठरला. राजकारणी ‘अशा’ नव-प्रतिमा असलेल्या कार्यकर्त्यांचा उपयोग तरी करत नसावेत? परंतु त्यांना तरी दोष का द्यावा. राजकारण्यांची ओळख शेट्टी
यांना नसावी असे म्हणणे धाडसाचे ठरेल. म्हणजे स्वतःलाच राजकीय पक्षाच्या दावणीला त्यांनी बांधून घेतले असे म्हटले तर वावगे ते काय? २००९ ते २०१९ खासदारकी भूषविणाऱ्या शेट्टींना २०१४ मध्ये पहिला धक्का बसला. लोकप्रिय आणि जनसमरन असा ्थ लौकिक मिळवणाऱ्या शेट्टींच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार पराभूत झाले. पुढे ते लोकसभेच्या निवडणुकीत पराभूत झाले. एक आदर्श अशा नेतृत्वाला जणू हे धोक्याचे इशारे होते. दांभिकता जी प्राप्त परिस्थितीत राजकारण्यांचा गुणविशेष झाली होती तिनेशेट्टी यांनाही त्याच मापात तोलले. असे कसे झाले? राजकारणात आदर्शवादाला स्थान नसते असा त्याचा अर काढायचा की ्थ शेट्टींनी भाजपाची साथ सोडून महाविकास आघाडीची कास धरणे त्यांच्या अनुयायांना रुचले नाही? नेते मोठे होत जातात तसे त्यांची जनतेशी नाळ तुटत जाते काय असा प्रश्नही यानिमित्ताने उभा राहतो. जनतेच्या आशा-आकांक्षा यापासून नेते फारकत घेऊ लागले की त्यांच्या नशिबी पराभव येत असावा. शेट्टींना त्यांचे खंदे समरकही सोडून ग ्थ ेले. असाच प्रकार अरविंद केजरीवाल यांच्या बाबतीतही होतच असतो. स्वतः केजरीवाल यांनीही अण्णा हजारे यांचे बोट सोडून आपली नवी वाट निर्माण केली होतीच की. प्रश्न असा आहे की जनता नेत्यांकडे आणि त्यांच्या एकनिष्ठतेकडे कसे पाहत असते? त्याचे मूल्यमापन कसे करीत असते? शेट्टी असो वा केजरीवालयांना बिघडलेल्या पुढाऱ्यांच्या मांदियाळीत का बसवत असते? ते काही असो पण शेट्टी आता पुढचे मार्गक्रमण कसे करणार हे पाहणे कु तूहलाचे ठरेल. राजकारणाला वेगळी कलाटणी मिळावी ही अपेक्षा असेल तर जनतेनेशेट्टींसारख्या नेत्यांना पाठिंबा द्यायला हवा आणि त्याची जाण कोणतीही आगळिक न करता या आदर्शवादी पुढाऱ्यांनी ठेवायला हवी.