डॉ. सूर्यवंशींचा ‘विजय’ तेव्हाच….

ेकायदा बांधकामांच्या समस्येवर अखंडीतपणे चर्वितचर्वण सुरू असते परंतु प्रत्यक्षात कारवाईचे प्रमाण अत्यंत अल्प असते आणि या समस्येवर तोडगाही निघत नसतो.
याचे कारण समस्येच्या मुळात जाण्याऐवजी त्यास सोयीस्कररित्या बगल देत रहाणे, प्रत्येक महापालिके ची हीच कहाणी आहे. परंतु कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या चिरंतन समस्येचा सोक्षमोक्ष लावण्याचे मनावर घेतले आहे. त्यात ते यशस्वी झाले तर आणि शहराची खरोखरीच भूमाफियांच्या
तावडीतून सुटका झाली तर आपल्याला ‘कहानी में ट्विस्ट’ असे म्हणता येईल.

सर्वच महापालिकांच्या विकास आराखड्यात आरक्षित भूखंड असतात. त्यांचे रुपांतर नियोजित प्रयोजनासाठी करण्याचा हेतू असतो. परंतु प्रत्यक्षात तो साध्य होत नाही. यास अनेक कारणे असतात. प्रामुख्याने त्यांचा विकास करण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीचा अभाव, भूखंडाबाबत हीतसंबंध, राजकारणी आणि बिल्डर यांचे
साटेलोटे, भूमाफियांचा हस्तक्षेप आणि या सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशासकीय इच्छाशक्तीचा अभाव; हलगर्जी अधिकाऱ्यांमुळे सर्व शहरांतील मोक्याचे भूखंड हे महापालिके शी संबंधित लोकांच्या घशात गेले आहेत. डॉ. सूर्यवंशी यांनी या बळावलेल्या रोगाचे अचूक निदान के ले असून त्यावर जालीम उपाय करण्यापूर्वी रोगाच्या मुळात शिरण्याचे ठरवले आहे.

महापालिका क्षेत्रातील सुविधा भूखंड क्रीडांगणे, उद्याने, बगिचे, रस्त्यांचे रुंदीकरण, रुग्णालये, समाजमंदिरे आदी गोष्टींसाठी वापर व्हावा ही अपेक्षा या भूखंडांवर अतिक्रमण करणारे भूमाफिया पायदळी तुडवत असतात, या आरक्षित जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करुन आपल्या मजुरांची नावे टाकत असतात. प्रसंगी अशा इमारतींवर हातोडा पडला तरी भूमाफियाचे नाव गुलदस्त्यातच राहत असते. ही मोडस ऑपरंडी तोडण्याचा निर्धार आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी के ला आहे. तिऱ्हाईत नावाने सुरु असलेल्या बांधकामांमागे असलेले माफिया शोधून काढण्याची मोहिम महापालिकेने हाती घेतली आहे. या इमारतींना प्राथमिक सुविधा कशा पुरवल्या जातात हा प्रश्नही सर्वसामान्य माणसांना भेडसावत असतो. अशा इमारतींचे पाणी तोडण्याचा धाडसी निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. धाडसी एवढ्यासाठीच कारण बहुसंख्य माफिया हे कोणत्या न कोणत्या पक्षाचे सदस्य असतात. त्यामुळे पाणी असो की वीज ती तोडताना विरोध होत असतो. अशा वेळी मानवतावादाच्या नावाने गळा काढणारे पाणी-वीज कापण्यास विरोध करतात. मतदारांसाठी ‘कु छ भी’, या ब्रिद वाक्याने प्रेरित पुढारी, त्यांचे ओशाळे प्रशासन आणि सरतेशेवटी मानवतावाद या तीन आव्हानांवर डॉ. सूर्यवंशी कसा ‘विजय’ मिळवणार हे पहाणे कु तुहलाचे ठरेल.