लाच देणे आणि घेणे हा भारतीय समाजव्यवस्थेचा एक अपरिहार्य आणि तितकाच दर्ुदैवी भाग बनला आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे एकु णातच कार्यालये बंद असल्याने असे संशयास्पद व्यवहार फार होऊ शकले नव्हते. सरकारी तिजोरीतच खडखडाट तर नवीन कामे मिळवण्याची शक्याता जवळपास थंडावलेली. कोण, कोणाचे विनाकारण हात ओले करेल? लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जाहीर के लेल्या ताज्या आकडेवारीनुसार २०२१ च्या तुलनेत २०२२ च्या पहिल्या तिमाहीत लाचखोरी १८ टक्क्यांनी घटली आहे. कोरोनाच्या विषाणूप्रमाणे भ्रष्टाचाराच्या विष्णुनेही निरोप घेतला की काय अशी आशा यानिमित्ताने जागी झाली. ‘ना खाऊं गा, ना खिलाऊं गा’ या देशव्यापी घोषणेमुळे भ्रष्टाचार कमी झाला असेल तर त्याचे श्रेय कें द्र सरकारला आणि प्रामुख्याने नरेंद्र मोदी यांना द्यावे लागेल. २०२१ च्या पहिल्या तीन महिन्यांत २११ सापळे रचण्यात आले होते आणि त्यात २८४ जणांना अटकही झाली होती. हीच आकडेवारी अनुक्रमे १७३ आणि २२५ इतकी झाली आहे. त्याबद्दल संबंधितांनी स्वतःची पाठ थोपटून घ्यायला हरकत नाही. यामागे सार्वजनिक उपरती किं वा शाहनपण आले असा निष्कर्ष काढणे चुकीचे होईल. भ्रष्टाचार शून्य टक्के
कधीच येणार नाही हे मान्य के ले तरी भ्रष्टाचाराविरुद्ध राग होता की संधी मिळाली नाही म्हणून ते घटला असे प्रश्न उपस्थित होतात. आमच्या मते भ्रष्टाचाराचे पाणी जिथे
गळती असते तिथून पाझरायला सुरुवात होते आणि जागा मिळेल तसे ते पुढे सरकत जाते. अशाप्रकारे आपल्या सामाजिक रचनेचा ढाचा पूर्णपणे भ्र्रष्टाचारानुकू ल झाला
आणि त्याने समांतर अर्थकारण निर्माण के ले. तीन महिन्यांचे आकडे पहाता भ्रष्टाचाराचे उच्चाटन प्रक्रिया सुरु झाली आहे असे म्हणणे भाबडेपणाचे ठरेल. अर्थात हे चित्र आश्वस्थ करणारे आहे. ते टिकवण्यासाठी पैसे देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या मानसिकतेत बदल व्हावा लागेल. अर्थात आमच्या मानत अजूनही एक शंका आहे आणि ती शी की लाचप्रतिबंधक खात्याच्या जाळ्यातून मोठे मासे सुटले तर नसावेत? कोरोनामुळे लाखो नागरिकांचे मृत्यू झाले. पण समाजच्या दृष्टीने विकासाचा बाली गेला आणि त्याचे दरगामी पर ू िणाम आपल्या सर्वांनाच भोगावे लागणार आहे. दोन वर्षांचा आर्थिक अनुशेष आणि वेळापत्रकात झालेला तेवढ्याच काळाचा विलंब यावर मात झाली तरच हरवलेला विकास गवसणार आहे. या प्रक्रियेत भ्रष्टाचाराला जागा नाही. तसा विचार करणारे खोड घालतील. त्यामुळे लाचाकोरीपासून दोन हात दर राहणे ह ू िताचे ठरेल. कोरोनाने शिकवलेला एकमेव धडा होता की पैसे हेच सर्वस्व नाही. पैशापेक्षा मौल्यवान जीव असतो आणि तो भल्याभल्यांना आयपत असूनही विकत घेता आला नव्हता. मनाशी हा विचार पक्का के ला तर भ्रष्टाचार खरोखरीच काढता पाय घेईल.