काय म्हणतायत राज ठाकरे !

एकीकडे महाराष्ट्राच्या प्रगल्भ आणि पुरोगामी वैचारिक बैठकीचा महाराष्ट्रदिनानिमित्त उदोउदो होत असताना प्रत्यक्षात राजकीय आघाडीवर सुरू असलेले वाग्युद्ध पाहता संभ्रम निर्माण होत आहे. नेत्यांच्या बोलण्याला सर्वसाधारणपणे दांभिकपणाचे अधिष्ठान असते आणि त्यामुळे विश्वासार्हतेचा अं श जवळजवळ नगण्य; आपल्या सोयीचे बोलणे, सोयीचा अर्थ काढणे, तसा तो जनतेच्या गळी उतरवणे आणि या सर्व प्रक्रियेत आपला स्वार्थ साधून घेणे हे बहुतांश पुढाऱ्यांचे वैशिष्ट्य असते. त्यास नाही म्हणायला काही अपवाद असतात परंतु त्यांचे बोलणे आणि प्रत्यक्ष आचरण यात तफावत आढळते. गुढी पाडव्याची सभा, त्यानंतर झालेली ठाण्यातील उत्तर सभा आणि र विवारी औरंगाबादमधील सभा यांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी के लेली भाषणे अभ्यासली तर ते सर्वसामान्य जनतेत आधीपेक्षा अधिक प्रभाव टाकत असल्याचे जाणवते. सभांना होणारी गर्दी हे त्याचे हे लक्षण जरी मानले तरी विरोधक त्यावर जी प्रतिक्रिया देत आहेत त्या पहाता राज ठाकरे यांनी अनेकांच्या मर्मावर तर बोट ठे वले नसावे अशी शंका येते. पुढाऱ्यांचा पोकळपणा माध्यमे आणि सर्वसामान्य जनता उघड पाडत असते. परंतु प्रसंगी एखादा नेताच ती भूमिका पार पाडू लागला तर? राज ठाकरे सध्या नेमके हेच करू पहात आहेत आणि त्यामुळे त्यांच्या सभांमुळे गर्दी तर वाढेलच पण त्याचबरोबर अस्वस्थता. विषय भोंग्यावरून सुरू झाला आणि ठिणग्या उडू लागल्या. न्यायालयाने सर्वधर्मीयांना भोंग्यांच्या वापराबद्दल निर्बंध असताना कारवाईची वेळ येताच कें द्राकडे चेंडू टोलावणे योग्य नाही. राज
ठाकरे यांनी नेमक्या या बोटचेपेपणावर बोट ठे वले आहे. एकीकडे धर्म घराच्या चार भिंतीत पाळला जावा अशी आदर्शवादी भूमिका मांडणारे नेते निवडणुकीतील मत-पेढ्या हातच्या जाऊ नये म्हणून या भिंतीच पाडू लागले आहेत. हा शुद्ध दांभिकपणा झाला. त्यावर भाष्य करणारा नेता आपल्या मनीच्या गोष्टी कोणीतरी व्यक्त करतो आहे हे पाहून आनंदित झाला तर आश्चर्य वाटू नये. राज ठाकरे यांच्या सभांतून तशी प्रचिती येत आहे. राज हे भाजपाचे प्रवक्ते झाल्याची टीका होत आहे. अलिकडे अशा छुप्या युत्या आणि आघाड्यांना प्रमुख पक्षाचा ‘ब’ संघ मानले जाऊ लागले आहे. राज यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची प्रशंसा के ल्यामुळे ही शंका
बळावते. अर्थात नेत्यांच्या भाषणांकडे सामाजिक आणि धार्मिक दृष्टीकोनातून पहाण्याऐवजी पक्षातील चष्म्यातून पाहिले गेले तर समाजात सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांत शुद्ध आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होऊ शके ल. राज ठाकरे यांनी ती भूमिका निभावण्याची जबाबदारी स्वीकारली असेल तर त्यांच्याकडून अपेक्षा वाढत जाणार.
अर्थात त्यांच्या या विचाराला विधायक आणि रचनात्मक कृ तीची जोड मिळाली तर अधिक उत्तम ठरेल.