भारतीय निवडणुकीच्या परिघातील उमेदवार जिंकून येण्याचे निकष बदलत नसतील तर समाज आणि पर्यायाने लोकशाही परिपक्व होण्यापासून अजून खूप दर आहे असेच म्हणावे लागेल. पैशांचे, ू जातीचे, गुंडगिरी या तीन आयामांत बंदिस्त झालेली ‘इलेक्टिव्ह मेरिट’ ही संकल्पना उमेदवाराची ज्येष्ठता, त्याचे चारित्र्य आणि त्याची लोकप्रतिनिधी म्हणून असणारी क्षमता यांची पारख करू देत नाही असे काही निष्कर्ष कसबा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने काढावे लागतील. महाविकास आघाडीने ही जागा (भाजपाचा बालेकिल्ला) जिंकली आणि त्याचे श्रेय विजयी उमेदवार रवींद्र धंगेकर यांना द्यावे लागेल. मतदारांची पारंपारिक गणिते मोडकळीस निघणे तसे सोपे नसते. परंतु ती तुटली हे मान्य करावे लागेल. त्यावर भाजपात चिंतन वगैरे होईल. परंतु दिवंगत भाजपा आमदार श्रीमती मुक्ता टिळक यांच्या कु टुंबियांपैकी कोणाला उमेदवारी मिळाली असती तर निकाल वेगळा लागला असता काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. या मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची भूमिका किती निर्णायक ठरते, हेही या पराभवामुळे पक्षाच्या लक्षात आले असेल. जातीचा निकष पक्ष प्रतिमेपेक्षा मोठा होणे चांगले नाही हे मान्य के ले तरी तो नगण्य ठरू शकत नाही. अर्थात कोणती पेठ कोणाच्या मागे उभी राहिली हे यथावकाश समजेल आणि त्यानंतरच अचूक अनुमान काढता येऊ शकतील. चिंचवडची जागा भाजपाच्या ताब्यात राहिली. सहानुभूतीच्या लाटेचा सर्वसाधारणपणे फायदा होत असतो हे लक्षात घेतले तर या मतदारसंघात मतांची विभागणी झाली नसती तर आणखी एक धक्का बसू शकला असता. राजकारणात जर-तरला महत्व नसते. त्यामुळे त्यावर चर्चा करण्यात अर्थनाही. एक मात्र नक्की की आगामी निवडणुकीत भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांना अधिक प्रयत्न करावे लागणार, किं बहुना व्यूहरचनेतही बदल करावे लागणार. राज्यातील घडामोडींबद्दल संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काहीजणांनी अद्याप निर्णायक भूमिका घेतलेली नाही. कुं पणावरच्या मतदारांची ही मतपेढी (की मतपेठ?) असणार आहे. त्यांना आपल्याकडे कोण वळवतो यावर त्यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. बरेच दिवसांनी महाविकास आघाडी आणि खास करून उद्धव ठाकरे गटास आनंदाची बातमी मिळाली. एक नव्हे दोन घटना त्यांच्या बाजूने घडल्या. निवडणूक आयोगाच्या स्थापनेत सर्वसमावेशकता आणि कसबातील विजय, या दोन घडामोडींमुळे त्यांचा उत्साह वाढू शकतो. भाजपा आणि शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र आता आपला मोर्चा सवंग राजकारणापासून विधायक कृ तीकडे वळवावा लागणार आहे. राजकारणात रस नसलेली परंतु सरकारने कल्याणकारी काम करावे हे मानणारी मतांची एक मोठी ‘पेठ’ दर्लक्षि ु त ठे ऊन चालणार नाही.