जिथे-जिथे आपली यंत्रणा पोहोचत नाही तिथे-तिथे संबंधित क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक आणि सेवाभावी संस्थांना सोबत घेऊन महापालिके ने सार्वजनिक हिताचे उपक्रम राबवावेत ही अपेक्षा अवास्तव नाही. परंतु त्यासाठी वर्षानुवर्षे झापडबंद झालेल्या प्रशासनाला आपला दृष्टिकोन व्यापक करावा लागेल आणि त्यास पूरक अशी मानसिकताही निर्माण करावी लागेल. ठाण्यात अलिकडेच पाळीव प्राण्यांचा (पेट) महोत्सव भरवण्यात आला. त्यास ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. एक अभिनव उपक्रम म्हणून आयोजकांचे कौतुकही झाले. शहरासाठी काहीतरी चांगले करावे आणि शहराचे नाव सर्वदर पसरावे ू याकरिता शहरातील अनेक संस्था आणि व्यक्ती असे विधायक उपक्रम राबवत असतात. ठाणेवैभवनेगेल्या काही वर्षांपासून सातत्याने शहराच्या हिताचे उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांसाठी सामूहिक सूर्यनमस्कार, ‘हो रिक्षा’ सारखी अभिनव संकल्पना की ज्यामुळे रिक्षावाल्यांच्या वर्तनात बदल होऊन त्यांच्याविरुद्धचा आकस कमी होईल, महिलांमध्ये रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवणे, वृत्तपत्र वितरकांसाठी आरोग्य शिबीर, स्वच्छ-सुंदर गृहनिर्माण संस्थांसाठी स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असे अक्षरशः शेकडो उपक्रम गेल्या ४७ वर्षात राबवले. जो अनुभव आम्हाला आला तोच पाळीव प्राणी महोत्सवाच्या आयोजकांना आला. पाळीव प्राण्यांची नोंद करणे अनिवार्य असताना त्याबाबत जनजागृती करण्याची संधी या महोत्सवानिमित्त पशुवैद्यकीय विभागास देण्यात आली होती. ती त्यांनी स्वीकारली नाही. यावरून महापालिके ची उदासीनता दिसते. पर्यावरणाबाबतीतही महापालिके चे संबंधित खाते दोन पावले मागेच असते. जनसहभाग हा आयुक्त अभिजीत बांगर यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. नागरिकांचे म्हणणे ऐकायला ते प्राधान्य देत असतात.
त्यांच्यात जेवढी रुची आणि उत्साह आढळतो तो अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये अपवादानेच आढळतो. ही मानसिकता बदलायला हवी. या समाजसेवी संस्थांना आर्थिक सहाय्याची गरज नाही. त्यांना आवश्यक आहे ती फक्त अनुकु लता. जमल्यास पाठीवर शाबासकीची थाप. परंतु अशा उपक्रमात महापालिके चे नगरसेवक, अधिकारी
अभावानेच दिसतात. ज्या शहरात आपण राहतो त्या शहराबद्दलचे उत्तरदायित्व या यंत्रणेत का नसते? आमच्या असेही कानावर आले आहे की, श्री. बांगर हे वेळेच्या बाबतीत गंभीर आहेत. कर्मचाऱ्यांनी वेळेत यावे अशा सूचना त्यांनी अलिकडे के ल्या. त्यानंतर काही कर्मचाऱ्यांनी तर स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्जही के ले! अशा नकारात्मक मानसिकतेत शहराचे भले कसे होणार? सकारात्मकता दाखवणाऱ्या नागरिकांचा आणि संस्थांचा उत्साह तरी कसा वाढणार?