दहा दिवसांच्या राजकीय नाटकावर पडदा पडत असताना एका मागून एक धक्के सहन करणाऱ्या आम जनतेच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत आणि त्यांची उत्तरे राजकीय पक्षांच्या नेत्यांशिवाय कोणीच देऊ शकणार नाही. तशी मिळणे ही अपेक्षा नसल्यामुळे ही उत्तरे गुलदस्त्यातच राहणार आहेत. आपल्याला राजकारण बऱ्यापैकी समजायला लागले आहे असे फसवे समाधान सुखावून जात असताना या अनुत्तरित प्रश्नांमुळे राजकारण किती गूढ आणि अनाकलनीय असते या निष्कर्षावर जनता आली आहे.
स्वतःचे आणि काही अपक्ष मिळून 120 आमदार पाठीशी असताना शिवसेनेच्या फु टीर गटाला ज्यांची ताकद एक तृतीयांश आहे, मुख्यमंत्रीपद का बहाल झाले? सरकारमध्ये नसलो तरी सरकार चालेल याची जबाबदारी घेणार असे सांगणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यास का भाग पाडले गेले? भाजपाची ही खेळी असेल तर त्याचा अर्थ काय? ती खेळी नसेल तर मुख्यमंत्रीपद जे शिवसेनाही अडीच वर्षांनी द्यायला अशीही तयार होती ते पुन्हा सेनेकडेच (भले फु टीर) का सोपवण्यात आले? फडणवीस यांच्याबद्दल भाजपा श्रेष्ठींच्या मनात नेमके काय आहे? असे असंख्य प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा युक्तीवाद एखाद्या रोचक क्रिके ट सामन्याप्रमाणे किं वा रहस्यमय चित्रपटाप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेने कानाचे रान करून ऐकला. त्यामुळे 16 आमदारांवर उपसभापती कारवाई करणार का? केली तर त्याचा पक्षीय बलाबलावर विपरीत परिणाम तर होणार नाही ना? नवीन सभापती नेमून नवे सरकार महाविकास आघाडीचा डाव उलथवून तर लावणार नाही ना? नव्या प्रतोदाचा आदेश आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना आमदारांना लागू झाला आणि त्यांनी तो पाळला नाही तर त्यांच्यावर कारवाई होणार काय, असेही अनेक प्रश्न राजकीय पटलावर उपस्थित झाले आहेत. आपण पहिल्या दोन प्रश्नांकडे वळू या. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री का आणि अप्रत्यक्षपणे सेनेकडेच मुख्यमंत्रीपदाची सूत्रे का? दसर ु ा प्रश्न मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. त्याची बोच त्यांना अधिक जाणवणे स्वाभाविक आहे. जे 56 वर्षात झाले नव्हते ते या घटनेमुळे घडले होते. शिवसेना केवळ दभं ुगली नव्हती तर ती भाजपाच्या या चालीने दबु ळी बनली होती. त्यांनी पुन्हा एकदा अडीच-अडीच वर्षांच्या भाजपाबरोबर झालेल्या समझोत्याचा उल्लेख केला आहे. त्याला भाजपाने संमती दिली असती तर महाविकास
आघाडीचा (आता फसलेला) प्रयोग झालाच सता, अर्थात भाजपा या समझोत्याबद्दल आजही इन्कार करीत आहे. परंतु त्याचबरोबर अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद स्वतःकडे ठेवण्याऐवजी सेनेच्या फु टीर गटाला देऊन बसली आहे. यामागे जे राजकारण होणार आहे त्याची कल्पना जनतेला असू शकत नाही कारण तिला ते जाणून घेण्यासाठी वेळही नाही. दसरे ु म्हणजे राजकारणातील अनिश्चिततेत किती गुंतायचे हाही त्यांच्यासमोर प्रश्न असतो. परंतु त्यातील एक संभाव्य उत्तर असे असू शकते की गेल्या दहा दिवस सुरू असलेल्या नाटकाचे कथानक सत्तांतरापुरते सीमित नव्हते तर शिवसेनेला संपवण्याचा मोठा डाव त्यात लपला असण्याची शक्यता. वेंद्र फडणवीस केंद्रात मंत्री होतील किं वा प्रदेशाध्यक्ष होतील अशी एक अटकळ होती, तो अं दाजही चुकला आहे. शिवसेनेने बंड घडवून आणणाऱ्या शिल्पकारास मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळेल असे वाटत असताना काहीतरी भलतेच घडल्यामुळे भाजपा नेत्यांच्या मनात नेमके काय सुरू आहे याचा अं दाज बांधता येत नाही. हे शेवटचे धक्कादायक वळण फडणवीस यांच्याही गावी नव्हते हे त्यांच्या देहबोलीवरून दिसले. तेच मुख्यमंत्री होतील असे स्वतः श्री. ठाकरे यांना वाटले होते.
भाजपा नेत्यांनी टाकलेल्या या गुगलीचा अर्थ यथावकाश समजेल तेव्हा जनतेला राजकारणातील आणखी एक धडा समजल्याचा आनंद होईल. तोपर्यंत चर्चेचे च्युविंग-गम चघळत बसण्याखेरीज गत्यंतर नाही.