वाहतूक पोलीस कधी मनावर घेतील?

बरेच दिवसांपासून ठाण्यातील वाहतूक पोलीस खात्यावर लिहावे असे वाटत होते. आमचे वाचक आणि समाजात वावरणाऱ्या सर्वच स्थरांतील नागरिकांनी ही अपेक्षा व्यक्त के ली होती. या सर्वांचा सूर अर्थात टीके चा होता. वाहन चालकांच्या बेशिस्तीबद्दल बोलताना वाहतूक पोलिसांच्या उदासिनतेबद्दल ते बोलत होते. त्याची प्रचिती आम्हालाही अलिकडे वारंवार येऊ लागल्यामुळे अखेर आज या जिव्हाळ्याच्या आणि कोणत्याही क्षणी स्फोटक होऊ घातलेल्या विषयावर तातडीने मतप्रदर्शन करावे असे वाटले. हेतू इतकाच की मोठा अनर टळावा. त् ्थ यामुळे सुरुवातीलाच वाहतूक शाखेच्या समस्त कर्मचारी आणि अधिकारीवर्गाला कळकळीची विनंती आहे की,
जी निरीक्षणे आम्ही नोंदवत आहोत ती सर्वसामान्यांची व्यथा आहे आणि त्यामुळे या टीके कडे व्यक्तीगत न मानता कर्तव्यबुध्दीने ती सोडवण्याचा प्रयत्न व्हावा ही
अपेक्षा. ठाण्यातील अति-महत्त्वाच्या तीन हात नाक्याबद्दल लिहिणे प्रस्त ठरेल. या नाक् तु यावरील वाहतूक नियंत्रण हा गहन विषय आहे हे एकदा कबूल के ले की मग मार्ग सापडूशके ल. सात रस् हा नाका ओलांडत असतात. ते तिथे पोलीस चौकीही आहे. कायदा मोडणाऱ्यांवर पोलिसांचे बारीक लक्ष असते. ती वाहने अनेकदा रस्त्याच्या मधोमध थांबवून कारवाईची प्रक्रिया सुरु असते. त्यामुळे कोंडीत भर पडते आणि 30 ते 60 सेकंदांचा अवधी असलेल्या सिग्नलवर किमान दहा-बारा गाड्या खोळंबतात. ही कारवाई वाहने बाजूला घेऊन का के ली जात नाही? प्रत्क स ये िग्नलवर टायमर आहे. त्यामुळे अति- उतावळे चालक हिरवा सिग्नल पडण्यापूर्वीच सरकू लागतात. आधीच्या सिग्नलवर पाच ते सात सेकंदांचा हिरवा सिग्नल असताना वागळे इस्टकड टे ून तसेच नौपाड्याकडून येणारी वाहने या नियमांचे सर्रास उल्घन लं करतात. मुंबईकडून येणारे वाहन रस्ता ओलांडून जाईपर्यंत वागळेहून आलेली वाहने त्यांचा रस्ता अडवतात. हिरवा सिग्नल असूनही या वाहनचालकांना रस्त्याच्या मधोमध सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांच्या शिव्यांचे धनी व्हावे लागते. हा अनुभव आम्ही अनेकदा घेतला. प्रचंड मन:स्ताप होतो. कायद्याने वागणाऱ्यांना त्याचा विशेष त्रास होतो. म्हणून आम्ही दोन पर्याय सुचवतो. 1) टायमर काढून टाकावेत 2) या दोन्ही सिग्नलवर वाहतूक पोलिसांनी उपस्थित राहून उतावळ्या चालकांना चाप लावावा. मनुष्यबळ कमी आहे ही सबब आम्ही मान्य करणार नाही. त्याबद्दल पोलिसांनीच आत्मपरीक्षण करावे. ठाणे शहरातील गॅरेजेस, शेअर-रिक्षावाल्यांचे प्रवासी संख्चे उल्ये घन तसेच अ लं ति-वेगात बेदरकारपणे चालवणे या बाबींबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. वाहतूक पोलिसांच्या अस्तित्वालाच हे दोन घटक आव्हान देत आहेत. आमचे वाहतूक पोलिसांना आवाहन आहे की तुम्ही करीत असलेल्या कामाबद्दल जनतेला नितांत आदर आहे परंतु नियमांची फू टपट्टी लावताना पक्ष:पातीपणाहोणार नाही याचीही काळजी घ्या. ठाण्यातील वाहनसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामानाने पोलिसबल कमी पडत असेलही. परंतु काही छोटे उपाय, नागरिकांच्या सूचना वगैरे विचारात घेतले आणि सिग्नलवर पोलीस विखुरलेले असतील तर अनेक समस्या दर होतील. आम् ू ही अपेक्षा करतो की या लेखन-प्रपंचाचा संबंधितांवर परिणाम होऊन नागरिकांना न्याय मिळेल. ठाण्यातील जनतेचा रक्तदाब, ताण कमी करण्याची मोठी जबाबदारी वाहतूक पोलिसांवर आहे. या कामात नागरिकही त्यांना मदत करतील.