बीएसएनएलच्या कोपरीतील टॉवरमुळे ‘फाईव्ह जी’चे प्रक्षेपण होणार अखंडीत

वापर होणार ठाणे, मुंबई ‘एमटीएनएल’च्या सेवेसाठी

ठाणे: ‘फोर जी’ नेटवर्कवर ‘फाईव्ह जी’ची सेवा मिळेल की नाही, यासंबंधी यूजर्सना अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र ‘फाईव्ह जी’ची सेवा अखंडीत मिळणार आहे, असे ठाम मत ‘बीएसएनएल’मधील एका वरिष्ठ अभियंत्यांनी व्यक्त केले.

भारतात ऑक्टोबरपर्यंत ‘फाईव्ह जी’ सर्व्हिस येऊ शकते. परंतु, ‘फोर जी’ सिमवर ‘फाईव्ह जी’ सर्व्हिस दिली जाईल का, की यासाठी नवीन सिम कार्ड घ्यावे लागेल, याविषयी मुंबई-ठाणे महानगर टेलिफोन निगमच्या अधिकारी यांनी साशंकता व्यक्त केली. मुंबई, ठाणे व इतरत्र ‘फाईव्ह जी’ सेवा नियमितपणे सुरु होण्याचे सुतोवाच होईल, परंतु त्याच्या काही महिनेआधी याबाबत स्पष्टता होणार आहे, असे अभियंत्यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाकडून मोबाईल सेवांचे संचालन आणि देखभाल याची अदलाबदल करण्यात आली. त्यानुसार, मुंबई व ठाणे ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’ची (एमटीएनएल) सेवा भारत संचार निगम लिमिटेड’कडे (बीएसएनएल) १ सप्टेंबर २०२१ रोजी सुपूर्द करण्यात आली आहे.

दिल्ली आणि मुंबई व ठाण्यामध्ये ‘फोर जी’ सेवा सुरू करण्याचा निर्णय दूरसंचार विभागाने घेतला आणि 23 आॅक्टोबर 2019 रोजी झालेल्या बैठकीत ‘स्पेक्ट्रम’च्या प्रशासकीय वाटपाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानंतर आलेल्या ‘टू जी’ नंतर ‘थ्री जी’साठी नवीन सिम कार्ड जारी केले होते. त्यानंतर आलेल्या ‘फोर जी’चे युग सध्या सुरु आहे.

यामुळे सिमवर ‘फाईव्ह जी सर्विस मिळणार आहे की नाही याबाबत ग्राहकांमध्ये साशंकता व्यक्त होत आहे.  भारतात मोबाइल सेवा ‘टू जी’ सोबत सुरू झाली होती. परंतु, २००८ नंतर अन्य मोबाईल कंपन्यांनी देशात प्रवेश केला होता. सन २०११ मध्ये स्पेक्ट्रम लिलावानंतर खासगी ऑपरेटर्सनी आपली ‘थ्री जी’ सेवा सुरू केली होती. त्यांच्यासह अनेक कंपन्या होत्या. परंतु, त्यावेळी सेवा सुरू केल्यानंतर ऑपरेटर्सनी  वापरकर्त्यांमना ‘थ्री जी’सेवेसाठी नवीन सिम घ्यायला सांगितले होते. जुन्या सिमवर ही सेवा दिली नव्हती. त्याचवेळी ‘जिओ’ची सेवाही ‘फोर जी’ सोबत सुरू करण्यात आली होती. मात्र यासाठी नवीन सिम घेणे गरजेचे होते. त्यामुळे ‘फाईव्ह जी’ सेवेकरीता ‘फोर जी’ सिमवर सुरू होईल की नाही, असा यक्षप्रश्न लाखो ग्राहकांसमोर आहे.

‘फोर जी’ सिमवर आरामात ‘फाईव्ह जी’ सेवा दिली जाऊ शकते. परंतु, हे ऑपरेटर्सवर अवलंबून आहे. परंतु, अजूनही  ‘ऑपरेटर्स’नी वापरकर्त्यांना अंधारात ठेवले आहे. यासंबंधी अद्याप स्पष्ट अशी काहीच माहिती दिलेली नाही, असे ‘बीएसएनएल आणि एमटीएनएल’च्या संबंधित अधिका-यांनी सांगितले.

प्रत्येक ‘यूजर’कडून २५ रुपये एका सिम कार्डसाठी घेतले तर ३० कोटी किंवा ४० कोटी यूजर्सकडून हे पैसे घेतल्यानंतर कंपन्यांना कितीतरी फायदा होऊ शकतो.  भारतात आता ‘फाईव्ह जी स्पेक्ट्रम’ची लिलाव प्रक्रिया संपली आहे. आता  भारत देश ‘फाईव्ह जी’ सेवा घेण्यासाठी तयार आहे. येत्या १५ आॅगस्ट रोजी यासेवेसंबंधी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ‘एमटीएनएल’च्या असंख्य ग्राहकांनाही ‘फाईव्ह जी’ची सेवा ‘बीएसएनएल’च्या कोपरीतील टॉवरमुळे अखंडीत मिळणार आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘ भारत संचार निगम लिमिटेड’च्या टॉवरची ‘वरपासून खालीपर्यंत’ अलिकडेच आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली. हे काम गेले सहा महिन्यांपासून सुरु होते. या टॉवरची रंगरंगोटी ठराविक मध्यानंतर केली जात आहे. सन १९७० च्या काळात हा टॉवर उभारण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले.