मद्यधुंद कारचालकाची पाच जणांना धडक; चौघे गंभीर

उल्हासनगर: दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत असताना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चारच्या व्हीनस चौक परिसरात मोठा अपघात झाला. एका मद्यधुंद कार चालकाने भरधाव गाडी चालवत पाच जणांना धडक दिली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावर उपचार सुरू आहे.

या अपघातात कार चालकासह चार जण गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

कारचालक व्हीनस चौक परिसरातून कार भरधाव वेगाने घेऊन जात असताना त्याने रस्त्यातून जाणाऱ्या रिक्षा आणि काही लोकांना जोरदार धडक दिली. हा कारचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाल्याची माहिती जखमीने दिली. यातील दोघांवर खाजगी तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.