वर्सोवा पुलावरून टँकर खाडीत कोसळून चालकाचा मृत्यू

भाईंदर: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवरील वसईकडून ठाण्याला जाणाऱ्या मार्गीकेवर वर्सोवा पुलावरील लोखंडी रेलिंगचा कठडा तोडून टँकर खाडीत कोसळल्याची घटना सकाळी ११.३० च्या सुमारास घडली आहे.

गुजरातवरून माल भरून जीजे-१० टीएक्स ४१९१ या क्रमांकाचा टँकर ठाण्याच्या दिशेने जात असताना ही घटना घडली आहे. या घटनेत टँकर चालक मुन्ना चौहान राहणार गोरेगाव
याचा मृत्यू झाला. टँकरचा शोध घेत तो पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु असल्याची माहिती घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या पोलिसांनी दिली आहे.