ठाण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला मंजुरी

ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला मंजुरी मिळाली आहे. आमदार प्रताप सरनाईक हे गेली ११ वर्षे यासाठी पाठपुरावा करत होते. ठाणे महापालिका क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र असावे यासाठी स्थानिक आमदार प्रताप सरनाईक हे
सन २००९ला आमदार झाल्यावर गेल्या अकरा वर्षांपासून प्रयत्न करीत होते.

तीन वेगवेगळ्या सरकारच्या काळात विविध अडचणींमुळे हे काम मार्गी लागू शकले नाही. पण या कामासाठी आमदार सरनाईक यांनी सातत्याने शासनाकडे प्रयत्न सुरु ठेवले. सन २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे तीनवेळा बैठका घेतल्या. बैठकीमध्ये १४ एप्रिल
भारतरत्न डॉ. बाबासाहबे आंबेडकर जयंतीच्या आधी ठाणे येथील भवनाच्या कामाला अंतिम मंजुरी मिळावी यासाठी आमदार सरनाईक यांचा सरकारकडे पाठपुरावा सुरु होता. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन ३० मार्च, २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने या कामाला मंजुरीचे लेखी आदेश प्रसिद्ध केले आहेत.

महाराष्ट्र सरकारच्या ’भारतरत्न डॉ. बाबासाहबे आंबेडकर सामाजिक विकास योजने“ अंतर्गत ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मौजे घोडबंदर रोड येथील कासारवडवली पोलिस स्टेशन जवळील विकास प्रस्ताव क्रं. ८९/१२९ या सुविधा भुखंडावर डॉ. बाबासाहब आंबेडकर सांस्कृतिक भवन व विपश्यना केंद्र बांधण्याचे काम मंजूर झाले आहे. कासारवडवली पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या ठाणे महानगरपालिकेचा सदरहू सुविधा भुखंड ठाणे महानगरपालिकेने सामाजिक न्याय विभागाला मोफत हस्तांतरीत केलेला असल्याने सामाजिक न्याय विभागाला असलेला जागेचा अडसर देखील दर झाला आहे. शासनाच्या योजनेनुसार ९० टक्के खर्च शासन व १० टक्के खर्च महानगरपालिका करणार आहे. महानगरपालिकेच्या माध्यमातून या वास्तू देखभाल व दरूस्ती भविष्यामध्ये होणार आहे तसा ठराव ठाणे महानगरपालिकेने सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर के लेला आहे. यासाठी शासनाकडून १४ कोटी रूपये निधी मंजूर झाला असून या कामाची निविदा प्रक्रिया ह्या महिन्यात पुर्ण करून पुढील महिन्यात भवनाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात होणार आहे, अशी माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली.

राज्य सरकारने प्रकल्पमुल्याच्या १० टक्के प्रमाणे १.४० कोटी इतकी रक्कम या कामासाठी महापालिके कडे वर्गही के ले आहेत. त्यामुळे ठाणे शहरात डॉ. बाबासाहब आंबेडकर यांच्या नावे हक्काची भव्य वास्तू उभी राहणार असून आमदार प्रताप सरनाईक यांच्या गेल्या ११ वर्षातील प्रयत्नांना यश आले आहे.