डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा मंगळवारी भूमीपूजन सोहळा

कल्याण : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आं बेडकर यांचे कल्याण पूर्वेतील प्रभाग समिती “ड” कार्यालयाच्या आवारात भव्य स्मारक उभारले जाणार आहे. स्मारक उभारणी कामाचा भूमीपूजन सोहळा मंगळवार, १२ एप्रिल रोजी होणार आहे.

खासदार शिंदे यांच्या प्रयत्नाने स्मारकासाठी आवश्यक जागेचे खुप कमी वेळे त आरक्षण बदलण्यात आले होते. तर नगरविकास विभागाच्या माध्यमातून निधीही दिला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिं दे यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन मंगळवारी होणार असून शनिवारी सायंकाळी खासदार शिंदे यांनी स्मारकाच्या जागेची पाहणी के ली. यावेळी रिपाई नेते अण्णा राेकडे, देवचंद अं बादे, शिवसेनेचे माजी नगरसेवक निलेश शिं दे, महेश गायकवाड, विशाल पावशे, प्रशांत काळे आदी
उपस्थित हाेते.

यावेळी खासदार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यात विरोधात नाराजगी व्यक्त करत महाराष्ट्र सुरू असलेल वेगळं राजकारण थांबले पाहिजे, असे मत व्यक्त के ले तर दुसरीकडे टपाल कार्यालयांना इंटरनेटदृष्ट्या बळकट करण्यासाठी इं टरनेट सेवा पुरविणाऱ्या कं पन्यांबरोबर इतर कं पन्यांची सेवा घेण्याचीही मुभा या कार्यालयांना द्यावी  नाहीतर खासगी सेवा टपाल कार्यालयात सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी के ली.