ठाणे : राज्य शासनाने मुलींना राजमाता अहिल्यादेवी होळकर योजनेअंतर्गत एसटी मासिक बस पास मुलीना मोफत देण्यात दिला जात असून, जिल्ह्य़ातील सर्व शाळा व महाविद्यालयीन विद्याथीर्नीची गैरसोय होऊ नये म्हणून, ठाणे एसटी विभागातर्फे कर्मचारी शाळेतच एसटी पास देत आहेत. गेल्या दोन दिवसांत ३४१ पासेसचे वितरण केले असून १२०० फॉर्म वाटप करण्यात आले आहे.
विद्यार्थिनींना एसटीचा मोफत मासिक पास अणि विद्यार्थ्यांना ६७ टक्के सवलतीचा पास दिला जात आहे. विद्यार्थ्यांना पास मिळवण्यासाठी त्रास होणार नाही याची दक्षता ठाणे एसटी विभागाने घेतली आहे. विभाग नियंत्रक विलास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची मोहीम दररोज सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात ज्या शाळांना मोफत पास हवे असतील त्या शाळेने देखील जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा, एसटी कर्मचारी शाळेत येऊन पास देतील. शाळेची बसची मागणी असेल तर त्यांनी संबंधित आगाराशी संपर्क साधावा, अशी माहिती एसटी ठाणे विभाग नियंत्रक विलास राठोड यांनी दिली.