ठाणे : येथील प्रसिद्ध ज्युपिटर रुग्णालयात मृत झालेल्या पुरुष रुग्णाने अलिकडेच त्याच्या पाच अवयवांचे दान करुन समाजासमोर आदर्श ठेवला आहे.
मुंबई क्षेत्रीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या मार्गदर्शक तत्वांनुसार पाच अवयवांचे वितरण करण्यात आले आहे. हे दान या वर्षातील तिसरे अवयवदान आहे.
अवयव दान केलेली व्यक्ती २६ वर्षीय पुरुष आहे. अवघ्या २६व्या वर्षी संपूर्ण पार्थिव सरणावर जाण्याऐवजी त्यांनी ह्रदय, लिव्हर, पॅनक्रीआज, कॉर्निआ आणि दोन्ही किडनी हे अवयव अन्य गरजूंच्या कामी येतील, अशा उदात्त हेतूने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांशी चर्चा करुन हा महत्वाचा निर्णय घेतला, अशी माहिती मुंबई झेडटीसीसीच्या उर्मिला महाजन यांनी दिली. या वर्षीचे चौथे अवयवदान मुंबईतील डॉ. बालाभाई नानावटी आहे.