डोंबिवलीत शिवसेना आणि भाजपामध्ये बॅनर वॉर; भाजपा म्हणालं ‘विकासाचे मारेकरी’, शिवसेना म्हणते ‘गाजर दाखवलं’

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची मुदत ऑक्टोबर २०२० मध्ये संपली आहे. तेव्हापासून प्रशासक म्हणून पालिका आयुक्तांमार्फत पालिकेचा कारभार सुरु आहे. दरम्यान लवकरच महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

यामुळे कल्याण डोंबिवलीत सध्या महानगर पालिका निवडणुकांचे वारे वाहत आहेत. यामुळेच या भागातील प्रमुख राजकीय पक्ष असलेल्या शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांचे सत्र सध्या जोरात सुरु आहे.

डोंबिवलीत नुकतेच भाजपाकडून एकनाथ शिंदे विकासाचे मारेकरी असल्याचे बॅनर लावण्यात आले होते. यानंतर आता शिवसेनेनेही बॅनरच्या माध्यमातून आमदार रवींद्र चव्हाण यांना उत्तर दिलं असून उलट सवाल केला आहे.