मुंबई : मुंबईतील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासक ‘सुगी ग्रुप’ने आपल्या प्रवासात आणखी एक शिखर गाठले आहे. सुगी ग्रुपने मुंबईतील दादर पश्चिम येथील आपल्या ‘सुगी अथर्व’ या आलिशान निवासी प्रकल्पामध्ये एकशे साठ कुटुंबांना वेळेपूर्वीच घरांची नुकतीच आपूर्ती केली आहे.
सुगी ग्रुपच्या प्रकल्पांतील घरांचा ताबा वेळेवर देण्याच्या परंपरेचे व याबाबतीतील प्रतिबद्धतेचे प्रतीक म्हणून, ‘महाराष्ट्र भूषण’ आणि प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते या पूर्णत्वास गेलेल्या रहिवासी घरांच्या किल्ल्या घर खरेदीदार ग्राहकांना एका दिमाखदार सोहळ्यात प्रदान करण्यात आल्या. श्री अशोक सराफ यांच्यासह प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि निवेदिता सराफ यांच्या चमकदार उपस्थितीत हा वितरण सोहळा परळ येथील आयटीसी ग्रॅंड हॉटेल याठिकाणी पार पडला. अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
सुगी ग्रुपचे संस्थापक निशांत देशमुख म्हणाले, “आम्ही आमच्या घर खरेदीदारांना वेळेपूर्वी आणखी एक पुनर्विकास प्रकल्प यशस्वीरीत्या सोपविला आहे, याचा आम्हाला आनंद वाटतो. सुगी ग्रुपची ‘वेळेवर ताबा’ ही प्रत्येक घरमालकाला दिली जाणारी सर्वात शक्तिशाली हमी असून आमच्या चांगल्या व पारदर्शक कारभाराची पोच पावती आहे.”
‘सुगी ग्रुप’ वरील विश्वास सार्थ करीत या ग्राहकांचा यथोचित सन्मान करण्यासाठी झालेल्या या कार्यक्रमात नृत्याविष्कार, मनोरंजनात्मक कार्यक्रम तसेच सेलिब्रिटींसोबत फायरसाइड चॅट्स आयोजित केले होते. सुगी ग्रुपचे ग्राहकांशी भावनिक संबंधांचे प्रतीक म्हणून या ग्राहकांना तुळशीची रोपे आणि पैठणी साड्या भेट म्हणून दिल्या गेल्या.
श्री अशोक सराफ यांनी या कुटुंबांचे सुगी परिवारात स्वागत आणि त्यांच्या नवीन घरांसाठी त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सुगी ग्रुपच्या घरमालकांशी भावनिक संबंध जोडण्याच्या प्रयत्नांचे आणि व्यावसायिक प्रतिबद्धतेच्या रूपात वेळेवर घरांचा ताबा देण्याच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.
‘सुगी अथर्व’ हे सुगी ग्रुपच्या प्रमुख निवासी प्रकल्पांपैकी एक आहे. मुंबईतील प्रभादेवी येथे विस्तृत एक आणि दोन बेडरूमच्या घरांसह हा प्रकल्प साकारला गेला आहे. सुगी ग्रुपची ही उल्लेखनीय कामगिरी त्यांच्या तज्ञ बांधकाम सदस्यांच्या कठोर प्रयत्नांमुळे तसेच नियमांचे पालन करणे, उच्च दर्जाच्या साहित्य आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करण्यामुळे साध्य झाली आहे.
सुगी ग्रुप नेहमीच सामाजिक हिताच्या कार्यात सक्रियपणे सहभागी असतो. समुद्रकिनारा स्वच्छता, प्लास्टिक संकलन, महासागरांसाठी चालणे आदी कार्यक्रमांतून सुगी ग्रुपने पर्यावरण आणि समाजाबद्दलची आपली प्रतिबद्धता कायम दर्शवली आहे.