मार्चचा पगार न मिळाल्याने अंबरनाथ पालिका कर्मचाऱ्यांत नाराजी

अंबरनाथ : चालू महिन्याची १३ तारीख आली तरी मागील मार्च महिन्याचा पगार न मिळाल्याने अंबरनाथ नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना पसरली आहे. पगार मिळण्यास उशी र झाल्याने काही कर्मचाऱ्यांनी पालिका कार्यालयासमोर ठिय्या आं दोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. बुधवारी दपु ारी शासनाकडे अनुदान पालिके ला मिळाले असून कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अं बर न ाथ नगरपालिका कर्मचाऱ्यांचा त्यांचे मागील महिन्याचे वेतन दर महिन्याच्या सुरुवातीला प्राप्त होते , मात्र एप्रिल महिन्याची १२ तारीख झाली तरी वेतन न मिळाल्याने मंगळवार (१२ ) रोजी काही कर्मचाऱ्यांनी आं दोलन करून वेतन देण्याची मागणी के ली होती. नगरपालिके मध्ये अं दाजे ७५० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची
संख्या असून त्यांच्या दर महिन्याच्या वेतनासाठी शासनाकडून पाच कोटी रुपये अनुदान पालिके च्या बँके च्या खात्यात जमा होते. त्यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यात येते, मात्र मार्च महिन्यामध्ये मिळणारे अनुदान शासनाकडून उशिरा मिळाल्याने पगार देण्यास विलंब झाला होता. वेतनासाठी शासनाकडून दरमहा सात कोटी रुपये येणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात साडे चार ते पाच कोटी रुपये मिळत असल्याने उर्वरित रक्कम नगरपालिका निधीतून घेऊन वेतन देण्यात येत असल्याचे समजते.

यंदा पालिके ची मालमत्ता करवसुली यंदा ३८. ४३ कोटी इतकी समाधानकारक झाल्याने दिलासा मिळाला आहे. शासनाकडून दर महिन्याला मिळणारे सहाय्यक अनुदान एप्रिल महिन्यात उशिरा मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यास उशीर झाला आहे. आज बुधवारी सहाय्यक अनुदान मिळाले असून कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार मिळूशकतील, असे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांनी सांगितले.