ठाणे : सरळ सेवा भरती-२०२३ अंतर्गत अर्थ विभागात निवड झालेल्या उमेदवारांना १ ऑगस्ट रोजी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.
अर्थ विभागातील कनिष्ठ सहाय्यक लेखा १२ पद, वरिष्ठ सहाय्यक लेखा पाच पद अशा एकूण १७ नवनियुक्त उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आले आहे. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजनाथ बुरडकर तसेच अर्थ विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट-क सरळ सेवा भरती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी विविध संवर्गातील २५५ पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. आयबीपीएस या संस्थेद्वारे सदर परिक्षा घेण्यात आली असून काही संवर्गाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. इतर उर्वरित संवर्गातील निकालामध्ये पात्र उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी सुरू असून लवकरच निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील.