सिंघानिया शाळेतील ध्रुवीचे घवघवीत यश

ठाणे : नुकताच आयएससी बोर्डाचा निकाल लागला आहे. ठाण्यातील सिंघानिया शाळेतील तीन विद्यार्थ्यांनी १०० टक्क्यांच्या आसपास गुण मिळवले आहेत. ध्रुवी पंड्या हीने १२वी च्या परीक्षेत ९९.२५% मिळवून घवघवीत यश मिळवले आहे.

कोरोना काळात ऑनलाईन शाळा व ऑनलाईन वर्ग सुरु असताना यंदाच्या बारावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीने होऊन सुद्धा ध्रुवी हिने यश मिळवले आहेत. ध्रुवीच्या या यशाचा तीच्या आई वडिलांना खूप अभिमान आहे. अपेक्षेपेक्षा जास्त गुण मिळाले. संपूर्ण देशात गुणवत्ता यादीत माझे नाव येईल ही अपेक्षा नव्हती, अशी प्रतिक्रिया ध्रुवी हिने ‘ठाणेवैभव’ला दिली. ध्रुवीने मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहून संपूर्ण लक्ष अभ्यासावर देऊन हे यश मिळवले. ध्रुवी हिला भविष्यात सीए करायचे आहे.

ध्रुवीच्या ह्या यशात तिच्या आई वडिलांचा हातभार आहे. प्रत्येक विद्यार्थी हा त्याच्या क्षमतेनुसार अभ्यास करतो, त्यामुळे सर्व पालकांनी आपल्या पाल्यांवर जबरदस्ती न करता त्यांच्या कलानुसार व क्षमतेच्या आधारे त्यांना वाव द्यावा असे आवाहन ध्रुवीच्या आईने सर्व पालकांना केले आहे.