आनंद कांबळे/ठाणे
शिवसैनिकांचे दैवत असलेल्या कै. आनंद दिघे यांच्या जांभळी नाका येथिल छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील धर्मवीर आनंद दिघे टॉवरच्या पुनर्बांधणीसाठी अडीच वर्षांपूर्वी १५ कोटी मंजूर केले असतानाही आजतागायत हे काम रखडले असून शिवसैनिक या ध्यानमंदिराची आतुरतेने वाट पाहत आहेत.
जांभळी नाका येथे असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे सांस्कृतिक तसेच सामाजिक संस्थांचे कार्यक्रम होतात. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांचा पदस्पर्श या मैदानाला झाला आहे, त्यामुळे या मैदानातील टॉवरला कै. दिघे यांचे नाव देऊन त्यांच्या स्मृती जागृत ठेवण्यात आल्या आहेत. सध्या अस्तित्वात असलेला टॉवर फार जुना झाल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारच्या तिजोरीतून १५ कोटींचा निधी धर्मवीर कै. आनंद दिघे टॉवरची पुनर्बांधणी आणि ध्यानमंदिर बांधण्यासाठी ३ मार्च २०२२ रोजी मंजूर केले होते. संपूर्ण टॉवर तोडून त्या ठिकाणी नवीन टॉवर बांधणे, संरक्षक भिंत बांधणे, त्याचबरोबर ध्यानमंदिर बांधणे ही कामे करण्यात येणार होती, परंतु दोन ते अडीच वर्षे
करण्यासाठी तिसऱ्या उड्डाणपुलाची देखील निर्मिती करण्यात आली असली तरी दोन्ही जुन्या उड्डाणपुलावर वाहतूक सुरूच ठेवण्यात आली असल्याने हा पूल वाहतुकीसाठी सुरक्षित आहे का? हे आता तपासले जाणार आहे.
कळवा खाडी उड्डाण पुलासोबतच मुंब्र्याच्या उडाणपुलाचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्याचसोबत ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी १० ते १५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेला सॅटिस पश्चिम उड्डाणपुलाचे देखील स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. यासाठी आयआयटी या नामांकित संस्थेची मदत घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
शहरातली महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या या प्रकल्पांना जवळपास १५ ते २० वर्षे झाली असल्याने स्लॅब, पिलर्स, साऊंड बेरिंग आणि सळ्यांची तपासणी केली जाणार आहे. आयआयटी मुंबईच्या पथकाने तिन्ही पुलांची पाहणी केली आहे. पुढील आठवड्यात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सुरूवात होणार आहे. दिवसा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून रात्री युद्धपातळीवर काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता श्री. जवळकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले कि या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यु.सी.सी. या कंपनीला हे काम मिळाले आहे. पुढील काही दिवसांत या कामाला सुरुवात होणार आहे. अतिशय सुरेख अशी ही वास्तू होणार असून एक ते दीड वर्षात त्याचे काम पूर्ण होऊन ठाणेकरांना एक चांगले ध्यानमंदिर देखिल मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.