आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा २७ वा सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २८ ऑक्टोबर रोजी धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाईल.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांनी १९७४ ते २०२२ दरम्यान एकमेकांविरुद्ध १४१ एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने ९५ जिंकले आहेत, न्यूझीलंडने ३९ जिंकले आहेत, आणि सात सामन्यांचा निकाल लागला नाही. भारतात, त्यांनी आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत, ते सर्व ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत. विश्वचषकात, त्यांच्या ११ सामन्यांपैकी, ऑस्ट्रेलियाने आठ आणि न्यूझीलंडने तीन जिंकले आहेत. –
ऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ४ | ५ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने | ९५ | ३९ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये (भारतात) | ८ | ० |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये (विश्वचषकात) | ८ | ३ |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडची आतापर्यंतची कामगिरी
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला सहावा सामना खेळतील. ऑस्ट्रेलियाने त्यांचे पहिले दोन सामने गमावल्यानंतर जोरदार पुनरागमन केले आहे, तर न्यूझीलंडने त्यांच्या पाच पैकी चार सामने जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
सामना क्रमांक | ऑस्ट्रेलिया | न्यूझीलंड |
१ | भारताकडून ६ विकेटने पराभव | इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव |
२ | दक्षिण आफ्रिकेकडून १३४ धावांनी पराभव | नेदरलँड्सचा ९९ धावांनी पराभव |
३ | श्रीलंकेचा ५ विकेटने पराभव | बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव |
४ | पाकिस्तानचा ६२ धावांनी पराभव | अफगाणिस्तानचा १४९ धावांनी पराभव |
५ | नेदलँड्सचा ३०९ धावांनी पराभव | भारताकडून ४ विकेटने पराभव |
संघ
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स कॅरी, जोश इंग्लिस, शॉन अॅबॉट, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, मार्नस लाबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.
दुखापती अपडेट्स
ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड ज्याचा दावा हात फ्रॅक्चर झाला होता तो आता बारा झाला आहे आणि न्यूझीलंडविरुद्ध खेळन्याची शक्यता आहे. जर तो सलामीवीर म्हणून खेळेल, तर मिचेल मार्श आणि स्टीव्हन स्मिथ अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतील. दुसरीकडे, न्यूझीलंडसाठी, त्यांचा नियमित कर्णधार केन विल्यमसन डाव्या हाताच्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे सामन्याला मुकणार आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम किवी संघाचे नेतृत्व करेल.
खेळण्याची परिस्थिती
धरमशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना होणार आहे. या स्पर्धेतील पाचवा आणि शेवटचा सामना हे ठिकाण आयोजित करेल. येथे खेळल्या गेलेल्या चार सामन्यांपैकी प्रथम फलंदाजी करणाऱ्या आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी प्रत्येकी दोन जिंकले आहेत. या मैदानावर सर्वाधिक धावसंख्या ३६४ आणि सर्वात कमी १५६ आहे. फलंदाजीसाठी परिस्थिती चांगली असेल. मात्र, खेळपट्टी आणि ढगाळ वातावरण वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत करू शकते.
हवामान
दिवसभरात कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस राहील. 86% ढग आणि 3% पावसाची शक्यता असेल. पश्चिम-नैऋत्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
डेव्हिड वॉर्नर: मागील दोन सामन्यांमध्ये शतके ठोकली असून, ऑस्ट्रेलियाच्या या डावखुऱ्या सलामीच्या फलंदाजाने पाच सामन्यात ६६ च्या सरासरीने आणि ११० च्या स्ट्राईक रेटने ३३२ धावा केल्या आहेत.
अॅडम झाम्पा: ऑस्ट्रेलियाच्या या लेग स्पिनरने पाच सामन्यांमध्ये १३ बळी घेऊन प्रभावी ठरला आहे, ज्यामध्ये तीन चार विकेट हॉलचा समावेश आहे.
रचिन रवींद्र: न्यूझीलंडच्या या युवा अष्टपैलूने बॅट आणि बॉलने उपयुक्त योगदान केले आहे. त्याने पाच सामन्यांमध्ये ७३ च्या सरासरीने आणि १०१ च्या स्ट्राईक रेटने २९० धावा केल्या आहेत. त्याने डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करत तीन बळीही घेतले आहेत.
मिचेल सँटनर: न्यूझीलंडच्या या डाव्या हातच्या फिरकी गोलंदाजाने पाच सामन्यांमध्ये १२ विकेट्स घेतल्या आहेत, ज्यात एक फायफरचा समावेश आहे. मधल्या षटकांमध्ये तो खूप प्रभावी ठरला. याशिवाय, तो बॅटने देखील योगदान करू शकतो.
आकड्यांचा खेळ
- मिचेल मार्शला एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०० धावा पूर्ण करण्यासाठी ८० धावांची गरज
- डेव्हिड वॉर्नर (६) विश्वचषकात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या रोहित शर्माच्या (७) बरोबरी करण्यापासून एक शतक दूर
- स्टीव्हन स्मिथला विश्वचषकात १००० धावा पूर्ण करण्यासाठी २३ धावांची गरज
- लॉकी फर्ग्युसनला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० विकेट्स पूर्ण करण्यासाठी ३ विकेट्सची आवश्यकता
- मिचेल सँटनर त्याचा १०० वा एकदिवसीय सामना खेळणार
- टॉम लॅथमला एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४००० धावा पूर्ण करण्यासाठी ७७ धावांची गरज
- विल यंगला एकदिवसीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण करण्यासाठी ४१ धावांची गरज
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: २८ ऑक्टोबर २०२३
वेळ: सकाळी १०:३० वाजता
स्थळ: हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धरमशाला
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)