विविध विकासकामांचे करणार लोकार्पण
ठाणे : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ठाण्यातील विविध विकासकामांचे शनिवारी लोकार्पण करण्यात येणार आहे.
भाजपाचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह महापालिकेतील नगरसेवकांकडून शहराच्या विविध भागात विकासकामे करण्यात आली आहेत. या कामांचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शनिवारी सकाळी १० वाजता लोकार्पण करण्यात येणार आहे. या वेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे यांचीही उपस्थिती राहणार आहे. खासदार विनय सहस्रबुद्धे यांच्या खासदार निधीतून उभारलेले लोकमान्य टिळक दिव्यांग स्नेही उद्यान आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या निधीतून उभारलेल्या कै. वसंतराव डावखरे प्रेक्षागृहाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होईल. तर अन्य कामांची दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे लोकार्पण व भूमिपूजने होणार आहेत.
आमदार निरंजन डावखरे यांच्या आमदार निधीतून मारोतराव शिंदे तरण तलावालगत कै. वसंतराव डावखरे प्रेक्षागृह, वागळे इस्टेट येथील रत्ना ज्योती इमारतीजवळ निवारा शेड, कासारवडवली येथील विजय पार्कजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी शेड व कट्टा, कोपरीतील आनंद कोळीवाडा परिसरात निवारा शेड, वसंत विहार चौकात निवारा शेड, दिवा जंक्शन येथे चंद्रभान इमारतीलगत इ- टॉयलेट उभारण्यात आहे. भाजपाच्या नगरसेविका दिपा गावंड यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात उभारलेली ओपन जिम आणि ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या जॉगिंग ट्रॅक उभारला आहे. भाजपा नगरसेविका स्नेहा आंब्रे यांच्या प्रभागात कै. वसंतराव डावखरे उद्यानाच्या सुशोभिकरणाचे कामही पूर्ण झाले आहे. या कामांचे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लोकार्पण केले जाईल. तर भाजपाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी व नगरसेवक सुनेश जोशी यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून मासुंदा तलावासमोरील जैन स्थानक, दीपक सोसायटी, मारोतराव भवन रस्त्याचे डांबरीकरण, नगरसेवक कृष्णा पाटील व नगरसेविका नंदा पाटील यांच्या प्रभागातील गोकुळदासवाडी ते राधाकृष्ण मंदिर आरसीसी रस्ता, गोकूळनगर मुख्य रस्ता ते वीर बजरंग व्यायामशाळेपर्यंत आरसीसी रस्ता, आझादनगरमधील हनुमान मंदिर ते एकता चौकपर्यंत आरसीसी रस्ता आणि भवानीनगर येथे स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमिपूजन केले जाणार आहे.