ठाणे : ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या नावाने +९१ ८१६७२ ८३९१० या बोगस संपर्क क्रमांकावरून अधिकारी व नगरसेवकांना कॉल व एसएमएस करण्यात येत असून काही पैशाची मागणी देखील करण्यात येत आहे. या बोगस संपर्क क्रमांकास प्रतिसाद न देता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी केले आहे.
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या नावाने अज्ञात व्यक्तीकडून + ९१ ८१६७२ ८३९१० या बोगस क्रमांकावरून अधिकारी व नगरसेवक तसेच नागरिकांना संपर्क करण्यात येत आहे. यामध्ये व्हाट्सएप खाते देखील उघडण्यात आले असून यावर महापालिका आयुक्तांचा फोटो लावण्यात आला आहे. या क्रमांकावरून काही पैशाची मागणी देखील करण्यात येत आहे. सदरचा क्रमांक बोगस असून याविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बोगस संपर्क क्रमांकास नागरिकांनी प्रतिसाद न देता कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांनी केले आहे.