शेतजमीन वाटणीपत्राची दस्त नोंदणी फी माफ

राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली असून त्यामध्ये 10 मोठ्या निर्णयावर मोहोर लावण्यात आली आहे. राज्यात यापुढे शेतजमिनीच्या वाटणीपत्राच्या दस्तास लागणारी नोंदणी फी माफ करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीची आपसामध्ये वाटणी करायची असेल तर एकूण रेडीरेकनरच्या एक टक्के किंमत मोजावी लागायची. आता त्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता फक्त 500 रुपयांमध्ये ही वाटणी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या आधी शेतीच्या वाटणीपत्राच्या दस्तासाठी मोठी रक्कम मोजावी लागायची.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांच्या नियुक्तीच्या सुधारीत धोरणास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.