ठाणे: ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 11 कोलबाड येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मैदानात खासदार राजन विचारे यांच्या संकल्पनेतून नव्याने उभारण्यात आलेल्या रंगमंचाचे लोकार्पण महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी माजी महापौर नरेश म्हस्के, माजी गटनेते दिलीप बारटक्के, माजी सभागृह नेते अशोक वैती, माजी महापौर महिला जिल्हा संघटक स्मिता इंदुलकर, परिवहन सभापती विलास जोशी, उपशहर प्रमुख जगदीश थोरात, प्राध्यापक पाठक, अशोक चिटणीस, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, रुचिता मोरे, मधुकर पावशे, विलास सामंत, भास्कर पाटील, मंदार विचारे, संजय सोनार, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, चेतन पटेल, कनिष्ठ अभियंता चंद्रकांत सावंत व शिवसेना युवा सेना पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार राजन विचारे यांना या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदानात गर्दुल्ले व जुगाराचे अड्डे या ठिकाणी सुरू होते. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर राजन विचारे यांनी या मैदानाची प्रत्यक्ष पाहणी करून शहर विकास विभागात पाठपुरावा करून या मैदानावर झालेले अतिक्रमण काढून मैदान मोकळे करून घेतले. व यासाठी विशेष अनुदान निधी, महापालिका निधी तसेच नगर विकास विभाग निधी असे एकूण पाच कोटी ५८ लाख खर्च करून ही सुसज्ज अशी इमारत उभी केली. त्यामध्ये ठाण्यात पहिल्यांदाच सर्वात मोठा रंगमंच येथे उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये अत्याधुनिक व्यायाम शाळा व वाचनालय उभारण्यात येणार आहे याचेही लोकार्पण लवकरच होणार आहे या इमारतीच्या या कामाचे भूमिपूजन 26 जानेवारी 2017 रोजी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. होते मध्यंतरी कोव्हिड 19 मुळे दोन वर्ष हे काम बंद असल्याने जलद गतीने होऊ शकले नाही.