माळशेज घाटात ५२ वर्षीय ट्रेकरचा मृत्यू

मुरबाड: -तालुक्यातील निसर्गरम्य माळशेजघाट परिसरात काल नाशिकवरून १५ ट्रेकर्स ट्रेकिंगसाठी आले होते. ते माळशेज घाटाच्या पर्यटन निवासाशेजारील खोल दरीत उतरले असता, त्या ठिकाणी पाच ट्रेकर्स अडकले. अडकलेल्या ट्रेकर्सना काढण्यासाठी अथक प्रयत्न रविवारी दिवसभर चालू होते. शेवटी शिवनेरी ट्रेकर्सच्या माध्यमातून काही सदस्यांना वाचवण्यात यश आले. जवळपास १५ पैकी १४ सदस्यांना वाचवण्यात यश आले, मात्र एका ट्रेकरचा मृत्यू झाला आहे.

किरण काळे (५२ वर्षे, नाशिक एल.आय. सी) असे मृत्यू पावलेल्या ट्रेकरचे नाव आहे. माळशेज घाट परिसरात दरवर्षी शेकडो पर्यटक येत असतात. त्यामध्ये अनेक ट्रेकर्स ट्रेकिंग साठीही येत असतात, मात्र अशा घटना दुर्दैवी घटना अनावधानाने घडत असतात. खरे तर प्रशिक्षित असणारे ट्रेकर्स माहिती असणारे ट्रेकर्स यांनी इथ येणं गरजेचं आहे. त्यांनी या ठिकाणी फिरताना काळजी घेणं गरजेचं आहे.