जिझिया वसुलीविरोधात संताप
मुंबई : मार्च महिन्याच्या वीज बीलांसोबत महावितरणच्या लाखो ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठे वीचे बील देण्यात आली आहेत. सुमारे आठ हजार कोटी ग्राहकांच्या खिशातून वसूल के ली जातील असा अं दाज आहे. ग्राहकांत यामुळे नाराजी पसरली असली तरी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना सुरक्षा ठे व वसुल के ली जात आहे याची कल्पनाच नाही.
महावितरणने भर उन्हाळ्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठे वीचा शॅाक दिला आहे. ग्राहकांना सध्याच्या एका महिन्याच्या सरासरी बिलाऐवजी दोन महिन्यांच्या सरासरी बिलांची रक्कम महावितरणकडे जमा करावी लागणार आहे. सहा महिन्यात ही सुरक्षा ठे व हप्त्यात भरायची आहे. कं पनीने पाठवलेल्या बीलांत याचा कसलाच उल्लेख नाही.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात कं पनीने वीजपुरवठा सेवेच्या सुधारित तरतुदी राज्य वीज नियामक आयोगाकड सादर केल्या. वीजबिल भरण्यास 21 दिवसांची मुदत दिली जाते. त्यानंतर बिल न भरल्यास 15 दिवसांची नोटिस द्यावी लागते. यासाठी एका महिन्याहून जास्त कालावधी लागत असल्याने दोन महिन्यांच्या सरासरी बिलाएवढी सुरक्षा रक्कम जमा करण्याचे ठरले होते. बिलांच्या सरासरीचे गणित तयार के ले गेले आहे. गेल्या वर्षी त्याच महिन्यातील वीजबिल किं वा गेल्या तीन महिन्यांमधील वीजबिल… यापैकी जास्त असलेले बिल सरासरी म्हणून काढली गेली आहे. याच्या दप्पट र ु क्कम सुरक्षा ठे व ठे वायची आहे. काही ग्राहकांना दहा हजारांच्या पुढे पैसे जमा करावे लागतील. रीडिंग घेण्यापासून ते देयके येईपर्यंत दोन महिन्याचा कालावधी निघून जातो. त्यानंतर अनेक ग्राहकाकडून विलंबाने देयके भरतात. म्हणून एका ऐवजी दोन महिन्याची सुरक्षा ठे व घेण्याचा प्रस्ताव आहे. याचा अर्थ असा की प्रत्येक घरगुती वीज वापर ग्राहकाला दोन महिन्याची सुरक्षा ठे व या महिन्यात भरावी लागेल. सुरक्षा ठे व रक्कम 17 मे पूर्वी भरायची आहेत.