पालिकेने पोलिसांना दिले १०४८ फुटेज
ठाणे : गेल्या साडेचार वर्षांमध्ये ठाणे महापालिकेने लावलेल्या सीसी टीव्ही कॅमेऱ्यांमधून जवळपास १०४८ फुटेज ठाणे पोलिसांना डेटा सेंटरमधून उपलब्ध करून दिले
आहे. या फु टेजमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यास पोलिसांना मदत झाली आहे.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत नगरसेवक निधीतून व इतर माध्यमातून १५९८ आणि वायफायच्या माध्यमातून २५० कॅमेरे शहरात बसविण्यात आले आहेत. सप्बर २०१७ पा टें सून शहराच्या विविध भागात सीसीटीव्ही कॅ मेरे बसवण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. यातून महिलांची सुरक्षा तसेच सोनसाखळी चोरी, अपघात, आदींसह गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी हे कॅ मेरे महत्वाचा दवा ठरतील या उद् ु देशाने हे कॅ मेरे बसविण्यात आले आहेत. त्यानुसार नगरसेवक निधीतून १२०८ व इतर असे मिळून आतार्पयत १,५९८ कॅ मेरे बसविण्यात आल्याचा दावा महापालिके ने के ला आहे.
तर दुसरीकडे वायफायच्या माध्यमातूनही २५० कॅ मेरे बसविण्यात आल्याची माहिती महापालिके ने दिली आहे. दुसरीकडे मागील काही महिन्यांपूर्वी स्थायी समिती
आणि महासभेत देखील याच सीसीटीव्हीचा मुद्दा चांगलाच गाजला होता. शिव ा य अधिवेशनातही यावर चर्चा झाली होती. पोलिसांनी देखील हे कॅ मेरे कु चकामी असल्याचे सांगत उच्च क्षमतेचे कॅ मेरे बसविण्याच्या सुचना के ल्या होत्या. गुन्ह्यांची उकल होण्यासाठी तसेच गाडीचा नंबर शोधून काढण्यासाठी या कॅ मेऱ्यांचा काहीही उपयोग होत नसल्याचे पत्र पोलिसांनी ठाणे महापालिके ला दिले होते. ठाणे महापालिका क्षेत्रात ठाणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ आणि ५ चा भाग येत असल्याने या परिमंडळात घडलेल्या गुन्ह्याची उकल करण्यासाठी पालिके नेच बसवलेल्या सीसीटीव्ही कॅ मेऱ्यांची मदत घेतली आहे. ठाणे महापालिके ने या साडेचार वर्षात तब्बल १०४८ फु टेज ठाणे पोलिसांना दिले असून याचा चांगलंच उपयोग पोलिसांना झाला आहे. या कॅ मेऱ्यांनी टिपलेल्या फु टेजचा उपयोग के वळ ठाणेच नव्हे तर, मुंबई, नवी मुंबई, वाशी, मीरा-भाईंदर या पोलिसांना देखील झाला असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.