ठाण्यात नवीन कोरोना रुग्ण दोन आकडी

ठाणे: शहरातील नवीन कोरोना रुग्णांचा आकडा पुन्हा दोन आकडी झाला. आज १४ रूग्ण वाढले असून सक्रिय रुग्ण देखिल ५०च्या पुढे गेले आहेत तर अवघे सहाजण रोगमुक्त झाले आहेत.

महापालिका हद्दीतील वर्तकनगर प्रभाग समिती क्षेत्रात सर्वात जास्त आठ रुग्णांची भर पडली आहे. तीन रूग्ण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती भागात वाढले आहेत. उथळसर प्रभाग समिती भागात दोन आणि लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती येथे एका रुग्णाची नोंद झाली आहे. उर्वरित पाच प्रभाग समित्यांमध्ये शून्य रूग्ण नोंदवले गेले आहेत.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार सुरू असलेल्या रूग्णांपैकी सहा जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,६२८ ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी ५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मागील दोन महिन्यात पहिल्यांदा सक्रिय रुग्णांचा आकडा पुन्हा ५०च्या वर गेला आहे. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१३०जणांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ४५० नागरिकांची चाचणी होती. त्यामध्ये १४जण बाधित सापडले. आत्तापर्यंत २४ लाख १३,६१७ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,८१३जण बाधित मिळाले आहेत.