ठाणे: शहरात नविन कोरोना रुग्णांचा आकडा किंचित कमी झाला आहे. आज ९६ नवीन रुग्णांची भर पडली असून १९२जण रोगमुक्त झाले आहेत एकही रूग्ण दगावला नाही.
विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १९२जण कोरोनामुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८७,६२५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर १,८०७जणांवर घरी आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसून आत्तापर्यंत २,१३७जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५७७ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये ९६जण बाधित मिळाले. आत्तापर्यंत २४ लाख ६८,८३४ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये एक लाख ९१,५६९जण बाधित सापडले.