कोरोना रुग्णसंख्येने गाठला तळ

ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची संख्या तळाशी आली आहे. आज अवघ्या २२ नवीन रुग्णांची भर पडली आहे तर ४२जण रोगमुक्त झाले आहेत. सुदैवाने आज एकही जण दगावला नाही.

महापालिका हद्दीत नौपाडा-कोपरी, लोकमान्य-सावरकर, कळवा आणि दिवा प्रभाग समिती क्षेत्रात एकही रूग्ण सापडला नाही. सर्वात जास्त १२जण माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती परिसरात वाढले आहेत. पाच रूग्ण उथळसर आणि तीन रूग्ण मुंब्रा प्रभाग समिती भागात नोंदवले गेले आहेत. दोन जण वर्तकनगर आणि एक रुग्णाची नोंद वागळे प्रभाग समिती परिसरात झाली आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी ४२जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८०,९५४ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत तर रुग्णालयात आणि घरी २५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकही जण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील ७०४ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये २२जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २३ लाख ७४,२०४ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,३३७ जण बाधित सापडले आहेत.