ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा खाली आला आहे. आज १६३ नवीन रुग्णांची भर पडली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात ६२० रूग्ण सापडले आहेत तर सहा जण दगावले आहेत.
शहरातील प्रभाग समिती क्षेत्रात रुग्णांचा आलेख खाली आला आहे. सर्वात जास्त ७७जण माजिवडे मानपाडा प्रभाग समितीमध्ये सापडले. ३९-रूग्ण वर्तकनगर आणि १२जण उथळसर येथे सापडले आहेत. प्रत्येकी सहा रुग्णांची भर कळवा आणि नौपाडा-कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात नोंदवले आहेत. दिवा परिसरात आणि लोकमान्य-सावरकर नगर प्रभाग समिती भागात प्रत्येकी पाच रुग्णांची नोंद झाली आहे तर सर्वात कमी चार रूग्ण मुंब्रा येथे नोंदवले गेले आहेत.
कल्याण-डोंबिवली येथे १३० रुग्णांची भर पडली आहे. १७७ रूग्ण नवी मुंबई, २२जण उल्हासनगर, ४५ रूग्ण मीरा-भाईंदर आणि सहा रूग्ण भिवंडी महापालिका परिसरात वाढले आहेत. अंबरनाथमध्ये १५ रूग्ण, बदलापूर येथे नऊ जण आणि ठाणे ग्रामिण भागात ५३ रुग्णांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात १०९३३/रुग्णांवर घरी आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवी मुंबई येथे तीन, कल्याणमध्ये दोन आणि ठाण्यात एक असे सहा जण दगावले. आत्तापर्यंत ११८०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर सहा लाख ८१,०९३जण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत.