१५ ऑक्टोबर रोजी दिल्ली येथे गतविजेत्या इंग्लंडवर ६९ धावांनी दणदणीत विजय मिळविल्यानंतर, अफगाणिस्तान आपल्या पुढील सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध आत्मविश्वासाने मैदानावर उतरतील.
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ चा १६ वा सामना न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात १८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाईल.
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांनी २०१५ आणि २०१९ दरम्यान एकमेकांविरुद्ध दोन एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी न्यूझीलंडने दोन्ही जिंकले आहेत. हे दोन एकदिवसीय सामने त्या त्या वर्षीच्या विश्वचषकादरम्यान खेळले गेले.
न्यूझीलंड | अफगाणिस्तान | |
आयसीसी रँकिंग (एक दिवसीय क्रिकेट) | ५ | ९ |
एक दिवसीय क्रिकेटमध्ये आमने सामने (विजय) | २ | ० |
विश्वचषकात (विजय) | २ | ० |
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मधील न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानची आतापर्यंतची कामगिरी
न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये आपला चौथा सामना खेळणार आहेत. दोन्ही संघांनी त्यांच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात विरोधाभासी केली आहे. न्यूझीलंडने पहिले तीन सामने जिंकले आहेत, तर अफगाणिस्तानने पहिले दोन सामने गमावले असून तिसरा सामना जिंकला आहे. या विश्वचषकात दोन्ही संघांनी इंग्लंडचा पराभव केला आहे जो त्यांच्यामधील एक समानतेचा मुद्दा आहे.
सामना क्रमांक | न्यूझीलंड | अफगाणिस्तान |
१ | इंग्लंडचा ९ गडी राखून पराभव | बांगलादेशकडून ६ विकेटने पराभव |
२ | नेदरलँड्सचा ९९ धावांनी पराभव | भारताकडून ८ विकेटने पराभव |
३ | बांगलादेशचा ८ गडी राखून पराभव | इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव |
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान: संघ, दुखापती अपडेट्स, खेळण्याची परिस्थिती, हवामान आणि कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायची गरज आहे
संघ
अफगाणिस्तान: हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झदरन, रियाझ हसन, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, इक्रम अलीखिल, अजमातुल्ला ओमरझाई, रशीद खान, मुजीब उर रहमान, नूर अहमद, फजलहक फारुकी, अब्दुल रहमान, नवीन उल हक.
न्यूझीलंड: केन विल्यमसन (कर्णधार)*, ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, विल यंग.
दुखापती अपडेट्स
गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेला त्यांचा कर्णधार केन विल्यमसन पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. १३ ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात विल्यमसनच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला थ्रो लागल्याने फ्रॅक्चर झाला होता. पहिले दोन सामने हुकल्याने तो न्यूझीलंडच्या तिसऱ्या सामन्यात नाबाद ७८ धावा करून परतला. मात्र, डाव्या हाताच्या अंगठ्याच्या फ्रॅक्चरमुळे तो काही काळ खेळापासून दूर राहण्याची शक्यता आहे. विल्यमसनच्या अनुपस्थितीत टॉम लॅथम न्यूझीलंडचे नेतृत्व करेल.* दुसरीकडे, अफगाणिस्तानला फिटनेसची चिंता नाही.
खेळण्याची परिस्थिती
चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना होणार आहे. हा दिवस-रात्र सामना असेल. अफगाणिस्तान या ठिकाणी आपला पहिला एकदिवसीय सामना खेळणार आहे, तर न्यूझीलंडने पाच सामने खेळले आहेत, त्यापैकी दोन जिंकले आहेत, दोन गमावले आहेत, आणि एका सामन्याचा निकाल लागला नाही. हे ठिकाण या स्पर्धेतील तिसरा सामना खेळणार आहे. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघांनी येथे खेळले गेलेले पहिले दोन सामने जिंकले आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या २२२ आहे. सामन्यात फिरकी गोलंदाजांचा प्रभाव पडेल अशी अपेक्षा आहे.
हवामान
हवामान अंशतः सूर्यप्रकाशित राहण्याचा अंदाज आहे. दिवसभरात कमाल तापमान ३२ अंश सेल्सिअस राहील. ढगांचे आच्छादन ४७% असेल आणि पावसाची २५% शक्यता असेल. ईशान्येकडून वारे वाहतील.
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
न्यूझीलंडसाठी, त्यांचा डावखुरा सलामीवीर डेव्हन कॉनवे महत्त्वाची भूमिका बजावेल. त्याने आपल्या संघासाठी या विश्वचषकात आता पर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. विश्वचषकाच्या सलामीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाबाद १५२ धावांच्या सर्वोत्कृष्ट प्रदर्शनासह तीन सामन्यांत २२९ धावा केल्या आहेत. कॉनवेची सरासरी ११५ आणि त्याचा स्ट्राइक रेट १०४ आहे. त्याच्याकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. गोलंदाजांमध्ये, डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनर किवीजसाठी या विश्वचषकात आता पर्यंत सर्वात यशस्वी ठरला आहे, त्याने तीन सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेतल्या आहेत. सँटनरने डावाच्या मधल्या टप्प्यात चांगली गोलंदाजी केली आहे.
अफगाणिस्तानसाठी, त्यांचा उजव्या हाताचा सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज लक्ष वेधून घेईल. त्याने मागील सामन्यात इंग्लंडविरुद्ध शानदार ८० धावा केल्या आणि इब्राहिम झद्रानसोबत पहिल्या विकेटसाठी ११४ धावांची भागीदारी केली. याशिवाय, मुजीब उर रहमान, राशिद खान आणि मोहम्मद नबी या फिरकी त्रिकूटाचे योगदान महत्वाचे असेल. त्यांनी अफगाणिस्तानच्या मागील सामन्यात इंग्लंडविरुद्ध १० पैकी आठ विकेट्स घेतल्या. तशीच त्यांना न्यूझीलंडसमोर चांगली गोलंदाजी करावी लागेल.

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १८ ऑक्टोबर २०२३
वेळ: दुपारी २:०० वाजता
स्थळ: एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स, हॉटस्टार
(सर्व आकडेवारी ईएसपीएन क्रिकइन्फो वरून घेतली आहे)