कडोंमपा आयुक्तांची माहिती
कल्याण: डोंबिवली एमआयडीसीमध्ये सातत्याने होणारे अपघात पाहता उद्योग मंत्रालयाने तेथून कंपन्या स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
एमआयडीसीमध्ये बुधवारी झालेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सुतोवाच केले.
एमआयडीसीमध्ये वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे सरकारने कंपन्यांच्या स्थलांतराचा ठोस निर्णय घेतला आहे. अमुदान स्फोटानंतर उद्योग मंत्रालयाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या असून, त्यात स्थानिक पातळीवर उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. उपसमिती एमआयडीसीतील कंपन्यांचे सर्वेक्षण करेल, त्यानंतर नियोजन केले जाईल, असे आयुक्त जाखड यांनी सांगितले.
नियोजन केल्यानंतर या कंपन्या स्वतंत्रपणे तीन श्रेणींमध्ये स्थलांतरित केल्या जातील. त्यासाठी उपसमितीने सर्वेक्षणाचा अहवाल 20 जूनपर्यंत उद्योग मंत्रालयाच्या प्रधान सचिवांना सादर करायचा आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात आयुक्त म्हणाल्या की, बफर झोन राखण्याची जबाबदारी एमआयडीसीची आहे.