आ. गीता जैन पुन्हा स्वगृही दाखल

भाईंदर : मीरा-भाईंदर मतदारसंघाच्या अपक्ष आमदार गीता जैन पुन्हा स्वगृही परतल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडून राजकीय भूकंपाचे धक्के मिळाल्यानंतर गीता जैन यांनी बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तब्बल २० मिनिटे गुप्त चर्चा झाली आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर उपस्थित होते.

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. त्यांच्यासोबत काही अपक्ष आमदार देखील आहेत. मात्र मीरा-भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी एकनाथ शिंदे सोबत न जाण्याचं ठरवले आहे. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महाराष्ट्र राज्याचे सरकार गडगडणार असे चित्र सध्या निर्माण झाले आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी तब्बल ४० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन बंडखोरी केली आहे. त्यांच्यासोबत काही अपक्ष आमदारही आहेत.

आ. गीता जैन मंगळवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित होत्या. त्यामुळे जैन हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत असल्याचं चित्र स्पष्ट झाले. परंतु बुधवारी सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्या पुन्हा भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. ‘मला देवेंद्र फडणवीस साहेबांनी बोलावलं होतं. मुंबईत मी भेट घेतली. सकारात्मक चर्चा झाली, पुन्हा भाजपमध्ये सहभागी झाले आहे’, अशी प्रतिक्रिया आमदार जैन यांनी दिली.