नवी दिल्ली : दिल्ली कथित दारु घोटाळा प्रकरण सीबीआयकडून अरविंद केजरीवालांना अटक केली आहे. दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणात सीबीआयने अनेक गंभीर दावे अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात केले आहेत.
सीबीआयने कोर्टात सांगितले, १६ मार्च २०२१ साली एका दारु उद्योजकाने सीएम केजरीवाल यांची भेट घेतली होती, १६ मार्चला दिल्लीच्या सचिवालयात मगुंटा रेड्डी आणि केजरीवालांची पहिल्यांदा भेट झाली होती, रेड्डी दक्षिणेतील खासदार आहेत आणि त्यांनी दारुच्या अबकारी धोरणावर सीएम केजरीवाल यांची मदत मागितली होती. यावर केजरीवालांनी मदत करण्याचे आश्वासन दिले पण आम आदमी पक्षांसाठी निधीची मागणी केली होती.
मगुंटा रेड्डी यांच्यासोबत कविता रेड्डी यांना संपर्क करायला सांगितला होता असा सीबाआयने दावा केला आहे. कविता रेड्डींनी मगुंटा यांची हैदराबादला भेट घेतली आणि पन्नास करोड रुपयांची मागणी केला तसेच हा सगळा प्रकार सीएम केजरीवालांच्या निर्देशानुसार होत होता असा दावा सीबीआय ने केला आहे. विशेष न्यायाधीश अमिताभ रावत यांनी राऊस अव्हेन्यू कोर्टाच्या परवानगीनंतर सीबीआयने केजरीवालांना अटक केली आहे. सीबीआयचे म्हणणे आहे की केजरीवाल त्या कॅबिनटचे मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी दारुच्या धोरणाला मंजुरी दिली.
अरविद केजरीवाल यांच्या वकिलांना सीबीआयच्या अटकेविरोधात विरोध दर्शवला आहे. केजरीवालांचे वकील विक्रम चौधरी म्हणाले केजरीवाल सध्या इडीच्या न्यायालयीन कोठडीत असताना सीबीआयने अटक केली आहे. संविधानाच्या अनुच्छेद २१ चे उल्लघंन करण्यात आले, सीबीआयकडे मागणी आहे की त्यांनी अटक वॉरंटची कॉपी आम्हाला द्यावी, असे चौधरी म्हणाले.