ठाणे : आवासन व शहरी कार्य मंत्रालय, दिल्ली यांचेमार्फत स्मार्ट सिटी आणि शहरे या अंतर्गत 500 स्मार्ट शहरांसाठी छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या माध्यमातून पर्यावरण व प्रदूषण विभागाने देखील महापालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी ही स्पर्धा आयोजित केली असून शहरावर होणारा हवामानाचा परिणाम आणि शहरातील हवामान बदलावर महानगरपालिकेने केलेली कृती, या दोन विषयांवर छायाचित्रण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यात प्रथम पारितोषिक 15 हजार आणि प्रमाणपत्र, दुसरे पारितोषिक 10 हजार आणि प्रमाणपत्र व तिसरे पारितोषिक पाच हजार आणि प्रमाणपत्र असेल. सर्व निर्णय परिक्षक घेतील.
फोटो महापालिकेच्या सोशल मिडिया हँन्डलवर देखील प्रकाशित केले जातील. या स्पर्धेत महापालिका क्षेत्रातील कोणीही नागरिक सहभागी होऊ शकणार असून नागरिकांना त्यासाठी वयाचे अथवा शिक्षणाचे बंधन नाही . छायाचित्रण स्पर्धेसाठी काढलेली चित्रे https://forms.gle/svCBXvJRzWpgPRPG6 या लिंकवर 22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत पाठविता येतील. इच्छुक स्पर्धकांनी काढलेले चित्र कल्याण-डोंबिवली शहरातील असावे. परीक्षकांनी विचारणा केल्यास त्याचा पुरावा उपलब्ध करून द्यावा लागेल. उदा.(पत्ता जीपीएस, समन्वय, स्थान) प्रति व्यक्ती , प्रति श्रेणी एक चित्र पाठविता येईल. त्याचप्रमाणे 50 शब्दांमध्ये तुमच्या चित्राविषयी शब्दांमध्ये थोडक्यात माहिती वरील लिंकवर इंग्रजी भाषेत पाठविणे आवश्यक आहे . प्रत्येक छायाचित्र 300 डीपीआय किमान आकारमानाचे 8×12 इंच असावे. तसेच सादरीकरणाच्या फाईल चा आकार 10 एमबीपेक्षा कमी असावा. सदर छायाचित्रण स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी (https://niua.org/c-cube/content/climate-change-awareness-campaign) या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच काही शंका असल्यास kdmc.cc2021@gmail.com वर मेल करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.