तब्बल 28 वर्षानंतर भेटले शिशु विकास माध्यमिक विद्यालयातील दहावीचे वर्ग मित्र

कल्याण : 1996 साली शिशु विकास शाळेतुन पास होऊन बाहेर पडलेल्या सर्व मित्रांचा दहावी नंतर वेगवेगळ्या रस्त्याने आयुष्याचा प्रवास सुरू झाला. मागील 28 वर्षापासून 4/5 लोकांव्यातिरिक कुणीही कुणाला भेटले नव्हते  किंवा संपर्कात हि नसल्याने जास्त  एकमेंबद्दल काही माहिती नव्हते. फेसबूकवर इतरांना एकमेकांना विचारत Shishu Vikas sch SSC 1996 हा ग्रुप रामेश्वर खरुळे यांनी तयार केला. स्नेह संमेलनाची कल्पना रामेश्र्वर खरुळे यांनी मनिषा नाईक यांना मांडली असता त्यांनी सर्व मुलींना एकत्र करण्याची जिम्मेदारी उचलली  आणि रामेश्वर खरुळे यांनी मुलांना एकत्र करण्याची जवाबदारी स्वीकारली याला ॲड. अलका पेडणेकर आणि संदिप शिंदे व दिनेश ठाणकर यांनी साथ  देण्याचे आश्वासन दिले.

शिशु विकास माध्यमिक शाळा, बेतुरकर पाडा, कल्याण प. येथे 1995-1996 साली दहावी झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे रविवारी ७ एप्रिल रोजी स्नेह संमेलन आयोजित केले होते. या स्नेह संमेलनाचे वैशिष्ट म्हणजे मधल्या काळात कुणीच कधी एकत्र भेटलेले नसल्याने एक,  दोन पाच दहा, वीस पंचवीस नव्हे तर तब्बल 28 वर्षानंतरची सकाळ वेगळीच उजाडली. मनिषा नाईक हिने कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली आणि सोबत शिकणारे स्व. जितेंद्र मोरे, स्व. रुपाली परब – शिंगोटे, स्व. उमेश बेतूरकर यांना श्रध्दांजली वाहिली त्यावेळी सर्व वर्र भाऊक झाला आणि नंतर पुढील कार्यक्रमला सुरूवात केली. मागील 28 वर्षापासून कुणीही कुणाला भेटले नव्हते  किंवा संपर्कात हि नसल्याने  नक्की हा कोण हि कोण असे प्रश्न सर्वानाच पडणार होते.  त्यामुळे कार्यक्रमाच्या रूपरेषा मध्ये स्वतः ची ओळख, घरच्यांबाबत थोडक्यात माहिती तसेच भविष्यात कुणीही एकांकी पडू नये, एक मेकांच्या मुलांना मार्गदर्शन याकरिता उपाय योजना योजव्यात याबाबत तसेच समजाची बांधिलकी जोपासण्यासाठी काय करता येईल इत्यादी बाबत माहिती स्वतः पुढे येऊन देण्याबाबत नियोजित केल्याप्रमाणे सर्वांनी आप आपला परिचय व माहिती दिली.

तसेच सर्वांना स्वतः ची माहिती भरुन देण्याबाबत सांगुन माहिती भरुन घेतली. त्यावेळी सदर शाळेतील काही मुले/मुली प्रोफेसर, शिक्षक, पोलीस, इंजिनियर, वकील, लिपिक, समाजसेवक तर कुणी मोठ मोठया कंपनी मध्ये सिनिअर मॅनेजर वगैरे पदावर असल्याचे कळले. तर कुणी स्वतः चे व्यवसाय सुरू करून सगळे व्यवस्थित स्थाईक असल्याचे समजले. सगळयांना आणलेला नाश्ताचा आस्वाद घेतल्यानंतर. रामेश्वर खरुळे यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता करत निरोप घेतला. त्यावेळी सर्वांना पुन्हा अजुन बराच वेळ थांबावे गप्पा मारायच्या राहिल्या अशी खंत वाटत होती.  त्यावेळी योगिता महारणे यांनी पुन्हा लवकरच भविष्यात लवकर नियोजन करून कायम भेटी घडून येतील असे कार्यक्रम अखावे असे सांगुन सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.