तंत्रज्ञानातील जिज्ञासेला ‘चिल्ड्रेन टेक सेंटर’ची दिशा

आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात भारत प्रगतीपथावर असला तरी या विषयातील तंत्रज्ञानाची कवाडे मात्र आजही पुस्तकातच बंद आहेत. आजकाल गाणे, नृत्य, पेंटिंग अशा अनेक कला छंद म्हणून जपल्या जातात. तर आजच्या २१ व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान हे छंद का असू नयेत? जर मुलांना लहानपणापासून विज्ञानाची गोडी लागली तर भविष्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात नक्कीच प्रगती होईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअरचेही अनेक पर्याय आहेत. त्याबद्दल माहिती घेऊयात…

हे क्षेत्र का महत्त्वाचे आहे ?

आजकाल संगणक हा आपल्या जीवनातला अविभाज्य घटक झाला आहे, तसेच तंत्रज्ञानही जणू आपला मित्रच झाला आहे. जवळजवळ सर्वच क्षेत्रात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर होतो. बँकिंगपासून ते सुरक्षा क्षेत्रात या तंत्रज्ञानाचा वापर होतो. तुम्ही करिअर कोणत्याही क्षेत्रात करा विज्ञान आणि तंत्रज्ञानाने तुम्हाला फायदाच होणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान शिक्षण ही सध्याची गरज झाली आहे. यात मशीन लर्निंग, AI, IoT सारख्या तंत्रज्ञानाने विज्ञान क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या तंत्रज्ञानाच्या प्रगतीनुसार 2030 पर्यंत क्रिएटिव्ह विचार, प्रोग्रामिंग, CAD आणि सहयोगी समस्या सोडवण्याची कौशल्ये असलेल्या विद्यार्थ्यांना जास्त मागणी असेल.

फायदे

विद्यार्थी वेगळा विचार करु लागतात.

समस्या सोडवण्याचे कौशल्य विकसित होते.

विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन निर्माण होतो.

विश्लेषणात्मक बुद्धिमत्ता निर्माण होते.

रोजगाराच्या संधी

आजकाल विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शिक्षण गरजेचे झाले आहे. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अमर्यादित करिअर संधी आहेत. रोबोटिक इंजिनिअरचे शिक्षण ज्या विद्यार्थ्यांनी घेतले आहे त्यांना सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्रात रोजगाराच्या संधी निर्माण होतात. यात तंत्रज्ञान आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात अनेक संधी असतात. मेकॅनिकल इंजिनीअर , इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर, कॉम्प्युटर इंजिनिअर या रोजगाराच्या संधी आहेत. सध्या आर्टिफिशल इंटेलिजन्स याला ही खूप मागणी आहे.

नवीन शैक्षणिक धोरणात समावेश – नवीन शैक्षणिक धोरणानुसार जे विषय आपण छंद म्हणून शिकवत होतो ते नवीन शैक्षणिक धोरणात पार्ट ऑफ करिक्युलममध्ये आले. यानुसार कोडींग, रोबोटिक, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स हे विषय मुलांना शिकवावे हे यात नमूद केले आहेत. त्यामुळे शाळाशाळांमध्ये या लॅबची गरज निर्माण झाली.

चिल्ड्रेन टेक सेंटर

चिल्ड्रेन टेक सेंटरची स्थापना २०१२ मध्ये करण्यात आली. हे शालेय मुलांसाठीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र आहे. येथे 8 ते 16 वयोगटातील शालेय मुलांसाठी विशेषतः डिझाइन केलेले विज्ञान, रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्समधील मजेदार छंद कार्यक्रमांसह शिकवले जातात. चिल्ड्रेन ट्रेक सेंटरने २०१५ ला ठाण्याच्या बाहेर ६ वेगवेगळ्या ठिकाणी शाखा सुरु केल्या. या क्लासेसला इंडियन एज्युकेशनचा बेस्ट रोबोटिक प्रोग्रॅम ऑफ २०२४ हा पुरस्कार नुकताच चंदीगड येथे मिळाला. ज्या महिला शिक्षित आहेत त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एडिसन क्लब नावाने केंद्र सुरु केले. ज्या महिलांचे शिक्षण काही कारणास्तव थांबले आहे किंवा सेवानिवृत्तीनंतर काय करावे हा प्रश्न पडला आहे अशा महिलांसाठी हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला. चिल्ड्रेन ट्रेक सेंटरमधील लहान मुलांनीही अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम केले आहेत. येथील विद्यार्थ्यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी रोबोटिक्स सँडल, घराच्या सुरक्षेसाठी रोबो नंदी, इको लॅम्प- दिवाळी कंदील (जो बोलतो आणि शुभेच्छा देतो) आणि ई-राखी बनवून राख्यांना हायटेक ट्विस्ट दिला. असे अनेक उपक्रम येथील ८ ते १६ वर्षीय मुलांनी केले आहेत. या उपक्रमाची संकल्पना मुलांचीच असून शिक्षकांनी फक्त तांत्रिक मदत आणि प्रोत्साहन दिले. येथे मुलांना ई लर्निंग सुविधा, ऍनिमेशन फॉर्ममध्ये शिकवले जाते. येथील विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाची सर्व साधने उपलब्ध आहेत. येथील सर्व साधने १२ होल्ड डीसीवर चालतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शॉक लागत नाही. येथील सर्व प्रशिक्षण अनुभवी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना दिले जाते. येथील शिकवण्याच्या पद्धतीही खूप मनोरंजक आणि सोप्या आहेत. या चिल्ड्रेन ट्रेक सेंटरमध्ये प्रॅक्टिकल ज्ञानाला महत्व दिले जाते.

तंत्रज्ञानात २०१२ साली खूप प्रगती झाली नव्हती आणि इंटरनेटही खूप खर्चाचे होते. त्या काळात मी विचार केला की, गाणे, नृत्य हे जर मुलांसाठी छंद असू शकतात तर आजच्या २१ व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञान हे छंद का असू नयेत? हा विषय घेऊन मी चिल्ड्रेन टेक सेंटरची स्थापना केली. जे विषय इंजिनिअरला शिकायला ४ वर्ष लागतात ते विषय येथे लहान मुलांना शिकवले जातात. बऱ्याच वेळा गणिताचे सूत्र लक्षात राहत नाही. पण येथे प्रॅक्टिकली शिकवले जाते त्यामुळे मुलांच्या पक्के लक्षात राहते. तुम्हाला तंत्रज्ञान क्षेत्रात जायचे असो वा नसो तंत्रज्ञानाची माहिती असणे गरजेचे आहे. त्यामुळे लहानपणापासून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतले पाहिजे, ही काळाची गरज होऊ लागली आहे. आनंद मिळावा म्हणूनच मी याची सुरुवात केले. आणि माझ्या या प्रयत्नांना ठाणेकरांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे मी खूप खूष आहे.

पुरुषोत्तम पाचपांडे, संस्थापक, चिल्ड्रेन टेक सेंटर, ठाणे

मी चिल्ड्रेन टेक सेंटरमध्ये आठवीत असताना प्रवेश केला होता. या क्लासमधून मला विविध तंत्रज्ञान संदर्भातील करिअरचे ज्ञान मिळाले. येथे समस्या कशा सोडवायच्या याबाबत ज्ञान मिळाले. तंत्रज्ञान संदर्भातील संकल्पना कुठे वापरायच्या हे समजले. आपल्याला माहिती आहे की इलेक्ट्रिसिटी निर्माण होते. पण ती नेमकी कशी होते याचे ज्ञान येथे मिळाले. या गोष्टी मला सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने शिकायला मिळाल्या. येथील शिक्षकांनीही मला खूप चांगले मार्गदर्शन केले.

अनय ताम्हाणे, माजी विद्यार्थी, प्रॉडक्ट डिझाईनर