‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांन जीवन गौरव पुरस्कार
कल्याण : ‘मुलांमध्ये वाचनाची आवड लहान वयातच निर्माण झाली तर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात लक्षणीय बदल घडतो’, असे मत कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ.इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केले.
कल्याणजवळील असलेल्या नंदिवली गावातील आर्य गुरुकुल शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात त्या बोलत होत्या. सावित्रीबाई फुले नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ यांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
डॉ.जाखड यांच्या आवाहनाला दुजोरा देत श्री. बल्लाळ म्हणाले, कोव्हिड पश्चात मुलांच्या मानसिकतेत अमुलाग्र बदल झाला असून शिक्षकांबद्दलचा आदर घटल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. शिक्षकांना हे आव्हान पेलताना पालकांची पूरक साथ मिळायला हवी. वाचनाची तुटलेली सवय पुन्हा निर्माण करण्यासाठी शाळेने केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
डॉ.कल्पना श्रीवास्तव आणि श्री. अशोक साळवे यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमास निवृत्त पोलिस महानिरीक्षक सुभाष आवटे उपस्थित होते.
आर्य गुरुकुलचे अध्यक्ष श्री.भरत मलिक आणि डॉ.नीलम मलिक यांनी मोठ्या कष्टाने संस्थेची उभारणी केली असून मुलांच्या सर्वांगीण विकासाकडे ते जातीने लक्ष देत असतात.