ठाणे: ठाणे महापालिकेच्या विद्युत विभागाच्या स्ट्रीट पोलमधून केबल टाकून विजेची चोरी केलेल्या वायरीचा शॉक लागून कळवा पूर्व, शिवाजी नगर येथील मंदार गौरी या १७ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ ते सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास समोर आली. उपचारार्थ रुग्णालयात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मंदार हा त्या परिसरातून जाताना हा प्रकार घडला. त्याला तातडीने उपचारासाठी स्थानिकांनी कळवा, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.