यावर्षी ठाणे जिल्ह्यात भाताचे ‘छप्पर फाड’ उत्पादन

उत्पादनात २३ टक्के वाढ

ठाणे : यंदाच्या वर्षी खरीप हंगामात सरासरीच्या ११२ टक्के एवढा मुबलक पाऊस असल्यामुळे चालू  वर्षी भाताच्या उत्पादनात २३ टक्के वाढ झाली आहे. जिल्ह्यात ३९.४२ क्विंटल प्रति असे विक्रमी उत्पादन आलेले आहे, अशी माहिती ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दीपक कुटे यांनी दिली.

ठाणे जिल्ह्यात यंदा ५५६०३ हेक्टर क्षेत्रावर भातपिकांची लागवड करण्यात आली होती. यावर्षात खरीप हंगामात सरासरीच्या ११२ टक्के एवढा मुबलक पाऊस झालेला आहे. खरीप हंगाम सन २०२२ मध्ये  तब्बल १० हजार ८४२.१६ मेट्रिक टन खताचे वाटप करण्यात आले आहे. संकरित वाणाची ७६८.४७ क्विंटल व सुधारित वाणाची १०३१७ क्विंटलची व्रिकीही झाली.

सद्यस्थितीत भातपिकाच्या कापण्या पूर्ण झाल्या असून ‘बळीराजां’ची मेहनत, सुधारित व संकरित जाती तसेच सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, निसर्गाची साथ, भातपिकावरील किड आणि रोग सर्वेक्षणासंबंधी प्रभावी अंमलबजावणी आणि केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची जोड असल्यामुळेच यावर्षी भाताच्या उत्पन्नात २३ टक्के वाढ झाली असल्याचे श्री. कुटे यांनी सांगितले.

बॉक्स करणे
सन २०१९-२० मधील उत्पादकता (क्विंटल हेक्टर) : २९.८१
सन २०२०-  २१  मधील उत्पादकता क्विं.हे: २७. ६५
सन २०२१-२२ मधील उत्पादकता क्विं.हे :३३.३७
सन २०२२ – २३ मधील उत्पादकता क्विं. हे : ३९.४२

तालुका            लागवडीखालील क्षेत्र           सन २०२२- २३ मधील उत्पादकता (क्विं./हे)
ठाणे                      ४४२.९५                         ४२.६२
कल्याण                 ४६७३.१८                       ४०.३४
उल्हासनगर           ४३४६. २५                      ४०.०६
मुरबाड                  १५०७९. ३०                    ३८.३४
शहापूर                  १५१६२.००                     ३८.५६
•िावंडी                   १५९००.००                     ४३.७६
एकूण :                  ५५६०३.६८                     ३९.४२