विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी आ. डावखरे

ठाणे: नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या तालिका सभापतीपदी कोकण पदवीधर मतदारसंघाचे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांची निवड झाली आहे.

आमदार निरंजन डावखरे यांच्या अभ्यासू कार्याचा हा गौरव आहे. आमदार निरंजन डावखरे यांचे वडील दिवंगत वसंतराव डावखरे यांनी विधान परिषदेच्या उपसभापतीपदी १८ वर्ष कार्य केले होते. त्यांनी काही काळ विधान परिषदेच्या सभापतीपदाचा कार्यभारही सांभाळला होता.